जेवण झाल्यावर पान खाणं आरोग्यासाठी योग्य की अयोग्य?

गोड पान… जेवणानंतर अनेकांच्याच आवडीचा पदार्थ. गोड काहीतरी हवं म्हणून बडीशेप, टुटीफ्रूटी, खोबरं, गुलकंद, चेरी, चिंचेची वाळलेली पानं आणि वरून चांदीचा वर्ख असं छानसं सजवलेलं गोड पान (betel-leaf) समोर आलं की एका क्षणात ते फस्त करण्याकडेच आपला कल असतो. काहींना तर पान खाण्याची इतकी सवय असते की हा नियम ते अजिबातच चुकवत नाहीत. पोट भरेपर्यंत जेवणाचा फडशा पाडल्यानंतर ते पचवण्यासाठी आणि जेवण पूर्णत्वास नेण्यासाठी आम्हाला गोड पान हवंत असं म्हणणारीही अनेक मंडळी तुम्ही पाहिली असतील.

हा झाला गोड पानाचा भाग. पण, अशीही काही मंडळी आहेत ज्यांना नित्यनियमानं पान – सुपारी खाण्याची सवय. पण, दररोज पानाचा विडा खाण्याचे अनेक वाईट परिणामही आहेत. जे जाणून घेण्याची आवश्यकता आहे. सहसा पानात असलेला चुना, सुपारी आणि अन्य पदार्थांमुळे आपल्या शरीरावर घातक (betel effects on body) परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळं दर दिवशी पानविडा खाणं टाळा आणि आरोग्य जपा. मुळात पान खाण्याचे काही फायदेही आहेत. पण, त्याच्या वाईट परिणामांकडे दुर्लक्ष करूनही चालणार नाही.

पान खाण्याचे वाईट परिणाम

कॅफिन (Caffine) आणि तंबाखूप्रमाणेच पानाचे परिणाम होत असतात . त्यामुळे आपल्याला पान खाण्याचे व्यसनही महागात पडू शकते. पानाचे अतिसेवन केल्याने हिरड्या, उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ शकतो. तसेच याने तोंडाचे विकारही होतात. तोंडातील लाळही (Mouth Diaeases) गळायला लागते. पानाच्या अती सेवनानं आपल्या छातीतही वेदना वाढून रक्तदाबावरही (Blood Pressure) परिणाम होतो. पान खाल्ल्याने तुमच्या तोंड आणि दातांवर परिणाम होण्याची शक्यता असते.

पान खाण्याचे फायदे

दुपारी जेवण झाल्यानंतर पानाची (betel-leaf) पेस्ट चघळल्याने आतड्यांचे आरोग्य सुधारतं. पान खाल्यानंतर आपल्या श्वासातील दुर्गंधी दूर होते. हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. अशी माहिती कळते की दातदुखी, हिरड्या दुखणे किंवा हिरड्यांना सूज येणे या समस्येने त्रस्त लोकांनाही पान खाल्यानं आराम मिळतो. याखेरीज तोडांचे आजारही सतावत नाहीत. पोटाची पीएच पातळीही पान खाल्लानं सुधारते असं म्हणतात. तसेच भुकही वाढते. सुपारीच्या पानांमध्ये औषधी गुणधर्मही असतात. याचा वापर थायरॉईडसाठीही गुणकारी असतो. रक्तातील साखरेच्या (Blood Sugar) नियत्रंणासाठीही त्याचा वापर होतो. पान खाल्ल्यानं मोठ्या आजारांवर मातही करता येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *