चर्चा निवडणुकांची, खासदार महाडिकांच्या फराळाला कोण-कोण नेते उपस्थित?
(political news) खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी महासैनिक दरबार हॉल येथे दिवाळी फराळाचे (Diwali Festival) आयोजन केले होते. यानिमित्ताने जिल्ह्यातील राजकारणी, सहकारातील कार्यकर्ते, उद्योजक, व्यावासायिक आणि विविध पक्षांचे पदाधिकारी एकत्र आले होते.
एका बाजूला श्रवणीय संगीत, दिवाळीच्या फराळाचे विविध जिन्नस आणि त्या जोडीला रंगलेल्या राजकीय चर्चा असा अनोखा माहोल या निमित्ताने सर्वांना अनुभवायला मिळाला. महाडिक कुटुंबाच्या वतीने दरवर्षी दिवाळी फराळाचे आयोजन केले जाते. याही वर्षी हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
एकीकडे फराळाच्या पदार्थांचा आस्वाद घेत राजकीय चर्चा रंगल्या होत्या. कार्यकर्त्यांच्यात विविध निवडणुकांची चर्चा रंगली होती. यावेळी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, पालकमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने, अण्णासाहेब जोल्ले, आमदार राजेश पाटील, राजेश क्षीससागर, माजी आमदार चंद्रदीप नरके, अमल महाडिक, भरमूअण्णा पाटील, माजी खासदार निवेदिता माने, समरजितसिंह घाटगे, अरुंधती महाडिक, स्वरूप महाडिक. (political news)
तसेच पृथ्वीराज महाडिक, कृष्णराज महाडिक, भीमा कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक, प्रा. जयंत पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, राजवर्धन निंबाळकर, विजय जाधव, राहुल चिकोडे, महेश जाधव, यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. शास्त्रीय संगीताने वाढवली रंगत सचिन जगताप (बासरी), केदार गुळवणी (सतार, व्हायोलीन), संजय साळोखे (ऑक्टोपॅड), अनिकेत ससाणे (तबला), आकाश साळोखे (कि बोर्ड) यांच्या जुगलबंदीने मैफलमधील रंगत वाढवली.