स्पेशल समोसा राईस रेसिपी

मराठवाड्याची राजधानी असणारं औरंगाबाद हे शहर पर्यटनाच्या बाबतीतही अतिशय समृद्ध आहे. तसंच खाद्यसंस्कृतीही प्रसिद्ध आहे. आज आम्ही तुमच्यासाठी औरंगाबादची फेमस रेसिपी घेऊन आलो आहोत. औरंगाबाद स्पेशल समोसा राईस झणझणीत तरी रेसिपी नक्की ट्राय करा. म्हणूनच औरंगाबादला आल्यावर हा स्पेशल पदार्थ खायला विसरू नका.

समोसा बनवण्यासाठी साहित्य –

१ कच्ची केळी शिजवलेली
१/२ टीस्पून बडी शोप अख्खे धणे
१०-१२ कडीपत्ता चे पान
१/४ टीस्पून हळद
१/२ टीस्पून लाल तिखट
१/२ टीस्पून गरम मसाला
१ हिरवी मिरची बारीक चिरलेली
१ टेबलस्पून हिरवे वाटाणे
चवीनुसार मीठ (salt)
१ टेबल स्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
समोसा बनवण्यासाठी कणिक
१ वाटी मैदा
चवीनुसार मीठ
१/४ टीस्पून ओवा
१ टेबलस्पून गरम तेल

राईस बनवण्यासाठी साहित्य

१ कप मुका शिजवलेला भात
१ टीस्पून तेल
५-६ कढीपत्त्याची पानं
१/२ टीस्पून मोहरी जीरे
१ लहान टोमॅटो बारीक चिरलेला
आलं पेस्ट
१/४ टीस्पून हळद
१/२ टीस्पून लाल तिखट
१/४ टीस्पून धणे-जीरे पावडर
आवडीप्रमाणे गरम मसाला
चवीनुसार मीठ (salt)
थोडीशी कोथिंबीर

तरी बनवण्यासाठी साहित्य

२ टेबलस्पून तेल
१/२ टीस्पून मोहरी जीरे
१/२ टीस्पून अद्रक पेस्ट
२ टेबलस्पून ओलं खोबरं
हळद, लाल तिखट, गरम मसाला, धने, जीरे पावडर पेस्ट
चवीनुसार मीठ
१.५ ग्लास पाणी

स्टेप १
सर्वप्रथम कढई गरम कर रा त्यामध्ये बडिशोप आखे घणे तेलामध्ये भाजून घ्या त्यामध्ये कढीपत्ता हिंग

स्टेप २
बाकीचे सर्व मसाले वटाणे कच्ची केळी टाकून व्यवस्थित मिक्स करून मसाला तयार करा.

स्टेप ३
एका पराती मधे मैदा ओवा मीठ तेल मिक्स करून आवश्यकतेनुसार पाणी घालून मिडीयम पीठ तयार करून घ्या. दहा मिनिट रेस्ट साठी राहू द्या त्यानंतर पिठाला मळून त्याची पोळी लाटून घ्या मधून कट करून क्या

स्टेप ४
दोन्ही भाग दुमडून कोण तयार करून घ्या समोसा सारण तयार केलेला त्यात भरून घ्या छान असे समोसे तयार झाले असतील एका बाजूला तेल गरम करायला ठेवा

स्टेप ५
स्लो गॅस वरती गोल्डन ब्राऊन रंगाचे समोसे तळून घ्या

स्टेप ६
भात बनवण्यासाठी कढाई गरम करा त्यामध्ये तेल मोहरी जीरे हिंग हळद कढीपत्ता टमाटर सर्व परतून घ्या त्यामध्ये सर्व मसाले टाकून भात चवीनुसार मीठ घाला व्यवस्थित मिक्स करून भात तयार झाला असेल

स्टेप ७
छानसा भात तयार झाला असेल हा असा भात आपण कुकर मध्ये पण बनवू शकतो कुकरमध्ये बनवले असता फक्त दोन शिट्टी घ्यायचीआहेत… त्यानंतर मिक्सर चा पोट घ्या त्यामध्ये ओलं खोबरं आणि सर्व मसाले टाकून व्यवस्थित पेस्ट तयार करून घ्या

स्टेप ८
एका बाजूला कढई गरम करा त्यामध्ये मोहरी जीरे हिंग लाल तिखट आणि वरून तयार केलेली ग्रेवी टाकुन परतुन घ्या छानसा परतून झाल्यावर त्यामध्ये पाणी टाका आणि उकळी येऊ द्या चवीनुसार मीठ टाका

स्टेप ९
छान तरी ला उकळी आल्यावर गरमा गरम समोसा भात आणि तरी तयार आहे.

स्टेप १०
आधी बाऊलमध्ये समोसा ठेवायचा आहे त्यावर फोडणीचा भात आणि तरी टाकून बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर शेव टाकून गरमागरम सर्व्ह करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *