आ. बच्चू कडू महाविकास आघाडीत जाणार? शरद पवारांचा मोठा खुलासा
(political news) दोन दिवस अमरावती दौर्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आपल्या घरी चहा पिण्यासाठी आमदार बच्चू कडू यांनी आमंत्रण दिले असून शरद पवारांनी ते स्वीकारले आहे. शरद पवार बच्चू कडू यांच्या घरी गुरुवारी जाणारा आहेत, असे खुद्द पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
शरद पवार दोन दिवस अमरावतीच्या दौर्यावर आहेत. या दौर्यादरम्यान ते बच्चू कडू यांच्या मिळालेल्या निमंत्रणानुसार त्यांच्या घरी भेट देणार आहेत. कुरळपूर्णा येथे गुरुवारी सकाळी दहा वाजता ही भेट होणार आहे. त्यामुळे महायुतीत नाराज असलेल बच्चू कडू पुन्हा महाविकास आघाडीत येणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याचबाबत शरद पवारांना पत्र परिषदेत विचारल्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. बच्चू कडू यांनी आपल्या घरी पाच मिनिटे चहा पिवून जा, असे निमंत्रण दिले आहे. त्यामुळे मी जाईन, असे पवार म्हणाले.
बच्चू कडू महायुतीत नाराज असल्याचे बोलले जात आहेत. अशावेळी बच्चू कडू यांना पुन्हा महाविकास आघाडीत आणण्याचे प्रयत्न केले जाणार का? असा प्रश्न उपस्थित केल्यावर त्यावर शरद पवारांनी मी त्यांच्याकडे जातोय. यामागे काही राजकीय हेतू नाही. एका विधानसभेच्या सदस्याने चहाला या म्हणून आमंत्रण दिले आहे, असे ते म्हणाले.
गेल्या काही महिन्यांपासून बच्चू कडू शिंदे-फडणवीस सरकारविरुद्ध आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. बच्चू कडू यांनी शेतकरी व मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारला अनेकदा धारेवर धरल्याचे देखील पहायला मिळाले आहे. दरम्यान अशातच आता महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही बच्चू कडूंचे निमंत्रण स्वीकारल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. (political news)
एखाद्या विधानसभा सदस्याने चहासाठी बोलावल्यावर जायला हवे. त्यांनी म्हणजे बच्चू कडू यांनी जाता-जाता माझ्याकडे चहासाठी या असे निमंत्रण दिले, ते निमंत्रण मी स्वीकारले असून तिथे जात आहे. मात्र, या भेटीमागे कुठलाही राजकीय हेतू नाही असे पवार म्हणाले. बच्चू कडू महायुतीत नाराज आहेत, ते महाविकास आघाडीत येणार असतील तर तुम्ही त्यांना घ्याल का, असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला होता. त्यावर, कशावरून, तुमच्याकडे तशी माहिती आहे? असा प्रतिप्रश्न शरद पवारांनी केला.