हातकणंगलेमधून कोण? राजू शेट्टी की ‘या’ नेत्याचा मुलगा?
(political news) महाविकास आघाडीची आज महत्त्वाची बैठक होणार आहे. मुंबईत काँग्रेस, शरद पवार गट आणि ठाकरे गटाची बैठक होणार आहे. आधीच्या बैठकांच्या तुलनेत ही बैठक खूप महत्त्वाची आहे. कारण आज कुठल्या पक्षाच्या वाट्याला किती जागा येणार? कुठला पक्ष कोणत्या मतदारसंघातून लढणार? त्या फॉर्म्युल्यावर अंतिम शिक्कामोर्तब होऊ शकतं. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ही बैठक महत्त्वाची असल्याच सांगितलं होतं. अशोक चव्हाण यांनी काँग्रेससोडून भाजपामध्ये प्रवेश केला, तेव्हा त्यांनी जागा वाटपाच्या मुद्यावरुनच टीका केली होती. अजून महाविकास आघाडीची जागावाटप ठरत नसल्याच त्यांनी म्हटलं होतं.
दुसऱ्याबाजूला महायुतीमधील तीन पक्ष शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातही चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत. त्यांचा सुद्धा अंतिम फॉर्म्युला ठरलेला नाहीय. महाविकास आघाडीत ठाकरे गटाने 23 जागांवर दावा सांगितला आहे. महाविकास आघाडीच्या आज मुंबईत होणाऱ्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत कोल्हापूर आणि हातकणंगलेच्या जागेवर अंतिम चर्चा होण्याची शक्यता आहे. हातकणंगलेमधून राजू शेट्टींना पाठिंबा द्यायची महविकास आघाडीची तयारी आहे. मात्र, राजू शेट्टींकडून अपेक्षित प्रतिसाद नसल्याने आजच्या बैठकीत अन्य पर्यायावर ही विचार होणार आहे. अन्य पर्यायांमध्ये जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील यांच्या नावावर सुद्धा चर्चा होऊ शकते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीहातकणंगलेमधून राजू शेट्टी यांचा धक्कादायक पराभव झाला होता. दोनदा खासदार राहिलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना झटका बसला होता. (political news)
‘या’ दोन मतदारसंघांबद्दल होणार अंतिम निर्णय
शिवसेनेच्या तिकिटावर लढणाऱ्या धैर्यशील माने यांनी राजू शेट्टींचा पराभव केला होता. राजू शेट्टी हे शेतकरी नेते म्हणून ओळखले जातात. शेतकऱ्यांचे मुद्दे घेऊन त्यांनी वेळोवेळी आंदोलन केली आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी त्यांनी अनेकदा आंदोलन केलय. हातकणंगलेमधून राजू शेट्टी महाविकास आघाडी सोबत जाणार की, अजून काही? ते अजून स्पष्ट झालेलं नाहीय. कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभेचे 2 मतदारसंघ आहेत. एक कोल्हापूर आणि दुसरा हातकणंगले. महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीत या दोन्ही मतदारसंघांबद्दल अंतिम निर्णय होऊ शकतो.