कोल्हापूर : मयुर फाटा येथे ट्रेलरची दुचाकीला धडक; तरूणाचा मृत्यू

पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मयुर फाटा येथे अवजड ट्रेलरची मोटरसायकलला धडक बसून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. हा आपघात बुधवारी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमार झाला. आरिफ महंमद हिसाख बेपारी (वय २५, रा. सदर बाजार,  कोल्हापूर) असे मृत तरूणाचे नाव आहे.

आसिफ आपल्या मोटरसायकल ‌(क्र. एम एच ०९ ए टी ७८६९) ने शिरोली औद्योगिक वसाहत येथील मयुर फाटा ब्रीज ओलांडून औद्योगिक वसाहतीमध्ये जात असताना पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेलर, (क्र. आर जे ०६ जे डी ८८५६) ची त्याला धडक बसली. त्या ट्रेलरचे चाक त्याच्या अंगावरून गेल्याने तो गंभीररित्या जखमी झाला. त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरिफ हा गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमध्ये कामास होता. कामानिमित्त शिरोली औद्योगिक वसाहतीमध्ये आला असताना हा अपघात झाला. या अपघाताची नोंद शिरोली पोलिसात झाली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *