शिरोळ तालुक्याच्या चौफेर विकासासाठी आम्हाला साथ द्या…….आदित्य राजेंद्र पाटील-यड्रावकर
कोंडिग्रे- शिरोळ तालुक्याच्या चौफेर विकास व्हावा यासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर साहेब यांनी मंत्री झाल्यापासून वेगाने काम केले आहे, कोरोना संसर्गाच्या महामारीमुळे राज्यासमोर आर्थिक संकट असताना सुद्धा अवघ्या दोन वर्षात २२० कोटी रुपयांचा निधी त्यांनी मतदार संघात खेचून आणला आहे.
विकास कामे करताना राज्यमंत्री यड्रावकर यांनी कधीच गट- तट, पक्ष ,संघटना, जात- पात न पाहता तालुक्यातील सर्वच गावांना योग्य प्रमाणात निधीचे वाटप केले आहे, शिरोळ तालुक्यातील सर्वसामान्य जनता, वडीलधारी मंडळी, माता भगिनी व युवक यड्रावकर परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे आहेत, त्यामुळे भविष्यात देखील जोमाने काम सुरू राहील, यासाठी सर्वांनी राज्यमंत्री यड्रावकर साहेब यांना साथ द्यावी असे आवाहन आदित्य राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले.
कोंडीग्रे येथे राज्यमंत्री यड्रावकर यांच्या सहकार्यातून मंजूर झालेल्या तीस लाख रुपयांच्या विकास कामांच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते, जनसुविधा योजने मधून दहा लाख रुपये तसेच 25 15 योजनेत मधून 20 लाखाचा निधी अशा एकूण 30 लाख रुपये खर्चाच्या विकासकामांचा शुभारंभ रविवारी झाला, मालगावे सुतार गल्ली मधील रस्ता व पेविंग ब्लॉक, तसेच चव्हाण यादव मळा या मार्गावर जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण ही कामे या निधीमधून केली जाणार आहेत, यावेळी सुशांत भुजगडे, योगेश खिलारे, किरण भोसले, तिरुपती कोळेकर, सचिन काडगे, बाबुराव मालगावे, तात्यासाहेब पाटील, अण्णासो बिलोरे, बाबू डोंगरे, वसंत पाटील, बबन भुजगडे, सुनील कामत, महादेव चव्हाण, राजकुमार नांद्रे, कल्लाप्पा हांडे, अशोक मगदूम, बाळासाहेब हांडे, जयदीप पाटील, दादासो मगदूम इतर मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.