कोल्हापूरकर अनिकेत जाधवची भारतीय फुटबॉल संघात निवड

बहरीन येथे होणार्‍या दोन आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण सामन्यांच्या तयारी शिबिरासाठी ३८ खेळाडूंची नावे शुक्रवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये कोल्हापूरचा फुटबॉलपटू अनिकेत जाधव याचा संघात समावेश करण्यात आला आहे. भारतीय फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांनी या सामन्यांसाठी संघामध्ये ८ नव्या खेळाडूंना संधी दिला आहे. भारताची २३ मार्चला बहरीनशी आणि २६ मार्चला बेलारूसशी मैत्रीपूर्ण लढत होणार आहे.
कोल्हापूरला क्रीडानगरी असे म्हणतात. या नगरीने आ्त्तापर्यंत अनेक उत्तम फुटबॉल खेळाडू घडवले. या खेळाडूंनी कोल्हापूरचं नाव जगभर पोहोचवण्यासाठी जीवापार कष्ट घेतले. कोल्हापूरचे फुटबॉलप्रेम हे भारतात सर्वश्रुत आहेच. पण कोल्हापूरकरांना एका गोष्टीची खंत अजूनही राहिली होती ती म्हणजे भारताच्या वरिष्ठ फुटबॉल संघात कोल्हापूरच्या कोणत्याही खेळाडूची वर्णी लागलेली नव्हती.
हा ऐतिहासिक क्षण अगदी जवळच्या टप्प्यात आला आहे. २१ मार्चपासून बहरीन इथे भारतीय (वरिष्ठ) संघाचे दोन मैत्रिपूर्ण सामने बहरीन (२३ मार्च) व बेलारुस (२६ मार्च) या संघांविरुद्ध होणार आहेत. याकरता ३८ खेळाडूंची संभाव्य यादीत कोल्हापूरचा खेळाडू अनिकेत जाधव याला स्‍थान मिळाले आहे. पुण्यात ११ मार्चपासून सुरु होणाऱ्या सराव शिबिरातून अंतिम २२ खेळाडूंची निवड होईल व हे खेळाडू बहरीनला रवाना होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *