“संघासाठी सर्वोत्तम…”; भारताच्या कर्णधार पदाच्या वादावर शाहिद कपूरची प्रतिक्रिया

सध्या अनेक देशांदरम्यान क्रिकेट मालिका सुरू आहेत. नुकताच १९८३ च्या वर्ल्ड कपवर आधारित एक चित्रपटही भारतात प्रदर्शित झाला आहे. त्यानंतर क्रिकेटवर आधारित जर्सी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहिद कपूर आणि मृणाल ठाकूर ही जोडी दिसणार आहे. सध्या ते जर्सी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, हा चित्रपट या शुक्रवारी म्हणजेच ३१ डिसेंबर रोजी देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता. हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होणार नाही असे म्हटले जात आहे.

मात्र हा चित्रपट क्रिकेटभोवती फिरत असल्याने यातील कलाकारांनी क्रिकेटच्या जगात घडणाऱ्या गोष्टींशी संबंधित काही प्रश्नांवर उत्तरे दिली आहेत. शाहिद कपूरला अलीकडेच टेस्ट आणि वनडे आणि टी२० क्रिकेटमधल्या कर्णधारपदाच्या वादाबद्दल त्याचे मत विचारण्यात आले. दुसरीकडे, मृणाल ठाकूरला तिचा आवडता क्रिकेटर कोण आहे? असा प्रश्न विचारण्यात आला.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, शाहिद कपूरने कसोटी आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील वेगवेगळ्या कर्णधारांशी संबंधित प्रश्नावर उत्तर दिले आहे. हे बीसीसीआयने ठरवायचे आहे. अशा विभाजित कर्णधारपदाचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत, असे शाहिद कपूरने म्हटले आहे.

“मला वाटते की हे बीसीसीआयने (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) ठरवायचे आहे. पण होय, दोन्हीचे फायदे आणि तोटे आहेत. पण, मला वाटतं संघासाठी जे सर्वोत्तम आहे तेच काम करावं. संघाच्या योग्यतेवर ते अवलंबून असेल असे मला वाटते,” असे शाहिद कपूर म्हणाला.

मृणाल ठाकूरला विचारण्यात आले की तिचा आवडता क्रिकेटर कोण आहे. त्यावर तिने तीन नावे घेतली. “मृणाल ठाकूर म्हणाली, विराट कोहली, सचिन तेंडुलकर आणि लसिथ मलिंगा हे माझे आवडते क्रिकेटर आहेत. विराट कोहली, सचिन तेंडुलकर माझे आवडते आहेत आणि मला माझ्या लांब, कुरळे केसांमुळे मलिंगा आवडतो,” असे मृणाल ठाकूर म्हणाली.

दरम्यान, काही आठवड्यांपूर्वी, विराट कोहलीच्या जागी रोहित शर्माला नवीन एकदिवसीय कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. अनेक चाहत्यांची उलटसुलट मते असताना, बीसीसीआय आणि भारताचा कसोटी कर्णधार पदाबाबत स्पष्टतेवरून जोरदार टीका झाली. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सांगितले की त्यांनी विराटला टी२० कर्णधारपदावरून पायउतार न होण्याची विनंती केली होती, तर विराटने असे कोणी सांगितले नसल्याचे म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *