अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या दुसऱ्या प्री-वेडिंगची विदेशात होणार धमाल

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट येत्या जुलै महिन्यात लग्नबंधनात(pre wedding) अडकणार आहेत. अशातच आता या कपलचा दुसरा प्री- वेडिंग सोहळा लवकरच पार पडणार आहे. यापूर्वी गुजरातच्या जामनगरमध्ये त्यांचा पहिला प्री- वेडिंग सोहळा पार पडला होता. अशातच आता अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा इटलीमध्ये चार दिवसांचा प्री- वेडिंग सोहळा पार पडणार आहे. या प्री- वेडिंग सोहळ्यासाठी अंबानी, मर्चंट कुटुंबासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी इटलीसाठी रवाना झालेले आहेत.

हा प्री- वेडिंग(pre wedding) सोहळा २८ मे ते १ जून दरम्यान इटलीतल्या क्रूझवर पार पडणार आहे. या प्री- वेडिंग सोहळ्यासाठी अख्खी बॉलिवूड इंडस्ट्री उपस्थित राहणार आहे. प्री- वेडिंग सोहळ्यासाठी रणबीर कपूर, आलिया भट्ट, राहा कपूर, सलमान खान, त्याचा पुतण्या निर्वाण खानसह अनेक सेलिब्रिटी मुंबई विमानतळावर पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाले होते.

यावेळी राधिका मर्चंट तिच्या फॅमिलीसोबत इटलीला रवाना झालेली आहे. पहिल्या प्री- वेडिंग सोहळ्यामध्ये रिहानाच्या परफॉर्मन्सने साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. या दुसऱ्या प्री- वेडिंगसाठी वाका वाका फेम शकिरा परफॉर्मन्स करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

कोलंबियन गायिका शकिराने दुसऱ्या प्री- वेडिंग सोहळ्यामध्ये फरफॉर्मन्स करण्यासाठी कोट्यावधी रुपयांचं मानधन घेणार असल्याचही म्हटलं जातंय. खरंतर शकिरा कोणत्याही खासगी इव्हेंटमध्ये परफॉर्म करण्यासाठी १० ते १५ कोटी रुपये मानधन घेते. पण अद्याप तिला किती मानधन मिळालं आहे, याबद्दलची अधिकृत माहिती मिळालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, प्री- वेडिंगमुळे बॉलिवूड बंद असणार असल्याची माहिती मिळत आहे. अनेक दिग्गज कलाकार या कार्यक्रमासाठी इटलीला रवाना झाले आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी प्री- वेडिंगची निमंत्रण पत्रिका व्हायरल झाली होती. दक्षिण फ्रान्सच्या किनाऱ्यावरील क्रूझवर हा प्री- वेडिंग इव्हेंट पार पडणार आहे. या इव्हेंटसाठी तब्बल ८०० मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे. सेलिब्रिटी, बिझनेसमन, क्रिकेटर्स सह आदी वेगवेगळ्या इंडस्ट्रीतले दिग्गज चेहरे उपस्थिती लावणार आहेत. रिपोर्टनुसार, प्री-वेडिंग सोहळ्यात पारसी, थाई, मेक्सिकन आणि जपानी पदार्थ असणार आहेत. त्यामध्ये गोड पदार्थांचा देखील समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *