शरद पवारांवरील ‘अष्टावधानी’ पुस्तकाचं प्रकाशन

गेल्या पाच दशकांहून अधिक काळ राज्य व देश पातळीवरील विविध क्षेत्रांत कार्यकर्तृत्व गाजवलेले माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त ‘लोकसत्ता’तर्फे तयार करण्यात आलेल्या ‘अष्टावधानी ’ या विशेष पुस्तकाचे प्रकाशन आज होत आहे. ज्येष्ठ उद्योगपती बाबा कल्याणी या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून असून, त्यांच्याच हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे.

शरद पवार यांनी अनेक क्षेत्रांत मूलभूत स्वरूपाचे काम केले आहे. या क्षेत्रांमधील नामवंतांनी त्यांच्या या कार्याबद्दल केलेल्या लेखांचे संकलन या विशेष पुस्तकात करण्यात आले आहे. राजकारणात सलग पाच दशकांहून अधिक काळ लोकांमधून निवडून आलेले लोकप्रतिनिधी म्हणून शरद पवार यांनी त्या काळात चार वेळा मुख्यमंत्रिपदासह केंद्रातही मंत्री म्हणून काम केले.
याबरोबरच समाजकारण, उद्योग, साहित्य, कला, क्रीडा, कृषी, प्रशासन या क्षेत्रातही पवार यांचा स्वतंत्र ठसा उमटला आहे. या सर्व क्षेत्रांतील अनुभवी आणि ज्येष्ठांनी पवार यांच्या त्या त्या क्षेत्रातील कार्याचे मूल्यमापन करणारे लेख या विशेष पुस्तकासाठी लिहिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *