“पालकमंत्री सतेज पाटील शिवसेना संपवतील”

पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) शिवसेना (political party) संपवतील. त्यांच्यापासून शिवसेनेने सावध राहावे, असा टोला भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आज येथे लगावला.

कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाताना ते बोलत होते. या मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन झाल्याने ही पोटनिवडणूक होत आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर थेट टीका करताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘शिवसेनेचा (political party) कार्यकर्ता हतबल आहे, नाराज आहे, अस्वस्थ आहे.

रोज उठून मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात मोर्चे काढले जातात. त्यामुळे अस्वस्थ आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिवसैनिकांना आपल्याला वाटेल ते करण्याची संधी आहे. ही संधी गेली तर काँग्रेस तुमच्या बोकांडीवर कायमची बसेल. यावर उद्या खासदार संजय राऊत म्हणणार आहेत, आमच्या घरचं आम्ही पाहतो. काय पाहता? ते रोज सकाळ-सायंकाळी दिसते आहे. टीव्ही ऑन करा म्हणजे कळेल.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *