सोमय्या यांच्या टार्गेटवर पुन्हा हसन मुश्रीफ

(political news) राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर घोटाळ्याचे आरोप करणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आता पुन्हा एकदा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे मोर्चा वळविला आहे. ते शुक्रवारी पुण्यात जाणार असून, मुश्रीफ यांच्य यांच्या विरोधात आयकर विभागाच्या अधिकार्‍यांना भेटणार आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून किरीट सोमय्या महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर घोटाळ्याचे आरोप करत आहेत. नुकताच त्यांनी दापोली दौरा केला होता.

या दौर्‍यात अनिल परब यांचे रिसॉर्ट तोडण्यासाठी प्रतीकात्मक हातोडा घेऊन ते दापोलीत गेले होते. या दौर्‍यानंतर किरीट सोमय्यांच्या रडारवर हसन मुश्रीफ आले आहेत. (political news)

सोमय्या यांनी ट्विट करून आपल्या पुणे दौर्‍याविषयी माहिती दिली आहे. आपण शुक्रवारी पुण्यात जाणार असून, आयकर विभागाच्या अधिकार्‍यांच्या भेटीत 158 कोटींच्या मनी लाँडरिंगप्रकरणी कागदपत्रे देऊन कारवाईची मागणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यापूर्वी सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांचे साखर कारखाने, तसेच मंत्री म्हणून घेतलेल्या निर्णयांमध्ये घोटाळ्याचे आरोप केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *