भारत सत्ताधारी भाजपच्या राज्यात काँग्रेसची मोठी बाजी
भाजप सत्तेत असताना सुद्धा स्थानिक स्वराज निवडणुकीत काँग्रेने बाजी मारली आहे. सर्वाधिक जागा मिळविण्याचा मान काँग्रेसने (Congress) पटकावला आहे. कर्नाटकातील शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत (Karnataka Local Body Election) काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. गुरुवारी जाहीर झालेल्या निकालात काँग्रेसने 1,184 पैकी 498 जागा जिंकून मोठे यश संपादन केले. (Karnataka Local Body Elections – Congress won BJP Loses)
कर्नाटकमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने भाजप समोर तगडे आव्हान उभे केले. काल गुरुवारी जाहीर झालेल्या निकालात काँग्रेसने 1,184 पैकी 498 जागा जिंकून चांगले यश संपादन केले. 58 शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 1,184 वॉर्डांचा समावेश करण्यात आला होता, ज्यामध्ये मतदान झाले होते. एकूण 1,184 जागांसाठी निवडणुका झाल्या, ज्यामध्ये काँग्रेसने 498, भाजपने 437, जनता दल (सेक्युलर) 45 आणि इतर 204 जागा जिंकल्या.
राज्य निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, काँग्रेसला 42.06 टक्के तर भाजपला 36.90 टक्के, जेडीएसला 3.8 टक्के आणि इतरांना 17.22 टक्के मते मिळाली आहेत. मात्र, शहर नगरपरिषदांमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. नगर पालिका परिषदेच्या 166 प्रभागांपैकी काँग्रेसने 61, भाजपने 67, जेडीएस 12 आणि इतर 26 वॉर्डांवर विजय मिळवला आहे.त्याचवेळी नगर नगरपरिषदांमध्ये काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या असताना पंचाय निवडणुकीत आघाडी घेतली. आकडेवारीनुसार, नगर पालिका परिषदेच्या 441 प्रभागांपैकी काँग्रेसला 201, भाजपला 176 आणि जेडीएसला 21 जागा मिळाल्या आहेत. याशिवाय पंचायतीच्या 588 प्रभागांपैकी काँग्रेसने 236, भाजपने 194 आणि जेडीएसने 12 तर इतरांनी 135 प्रभाग जिंकले.कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी राज्यातील जनतेचे आभार मानले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, हे निकाल काँग्रेसची विचारधारा आणि त्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या लोकप्रियतेची पुष्टी करतात. डीके शिवकुमार यांनी ट्विट केले आहे की, सध्या झालेल्या निवडणुकीच्या निकालाने राज्यात काँग्रेसची लाट असल्याचे संकेत दिले आहेत आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे निकाल याची पुष्टी करतात. 2023 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस जिंकेल आणि मी आमच्या मतदारांचे आभार मानतो. ज्यांनी आमचा उत्साह वाढवला आहे.
काँग्रेस नेते म्हणाले की, शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल भविष्यातील निवडणुकांसाठी मापदंड नसले तरी हे निकाल काँग्रेसची विचारधारा आणि त्याचे अनुसरण करणाऱ्या आपल्या लोकांच्या लोकप्रियतेची पुष्टी करतात. आपण पैशाने जिंकू शकतो हा भाजपचा अंदाज त्यांनी खोडून काढला आहे. जनहितवादी विचारसरणीचा विजय झाला आहे.
विशेष म्हणजे 2023 च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी हा निकाल महत्त्वाचा मानला जात आहे.