शिरोळ : निर्णायक लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष

(political news) जिल्हा बँकेसाठी निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर व गणपतराव पाटील यांच्या लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. तालुक्यात सेवा संस्था गटाचे 149 मतदार आहेत. त्याचबरोबर इतर गटाचे असे एकूण 561 मतदार आहेत. शिरोळ येथील पद्माराजे विद्यालयात निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून रिंगणातील उमेदवारांचे भवितव्य बंद होणार आहे.

सहा.निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहकारी संस्था निबंधक प्रेम राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान प्रक्रिया व्यवस्थितरीत्या पार पडण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. मतदानासाठी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या तीन खोल्या मतदान केंद्र म्हणून आरक्षित करण्यात आल्या आहेत. प्रत्येक केंद्रावर एक मतदान अधिकारी व सहा ते आठ या प्रमाणात इतर कर्मचारी अशी 24 जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता कडक पोलिस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. (political news)

मतदान प्रक्रिया शिक्के मारून, रंगीत मतपत्रिकांद्वारे पार पडणार आहे. यात सेवा संस्था, गटातील 149, नागरी बँका व पतसंस्था गटात 114, कृषी पणन व शेतीमाल प्रक्रिया गटामध्ये 56 आणि इतर 242 असे एकूण 561 मतदानासाठी पात्र आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *