“ज्याला दाखवायचं आहे त्याला मी…” – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

(political news) राज्यावर पुन्हा एकदा करोनाचं संकट असून लॉकडाउन लागण्याची भीती निर्माण झाली आहे. दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रकृतीच्या कारणास्तव कोणत्याही कार्यक्रमांमध्ये सहभागी होत नाही आहेत. हिवाळी अधिवेशनातही मुख्यमंत्री अनुपस्थित असल्याने विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात आली. दरम्यान विरोधकांच्या या टीकेवर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना आपल्यावर होणाऱ्या टीकेला शांतपणे घेतो, ज्याला दाखवायचं आहे त्याला त्याचवेळी मी करुन दाखवतो असं म्हटलं आहे. मुंबई पालिका निवडणुकीच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडलेल्या या बैठकीत ते बोलत होते.

उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी शाखाप्रमुख, विभागप्रमुख, नगरसेवक, आमदार, खासदार यांच्यासोबत बैठक पार पडली. उद्धव ठाकरे यांनी यावेळी आपल्यावर होणाऱ्या टीकेसंबंधी भाष्य केलं. “माझ्यावर होणाऱ्या टीकेला मी शांतपणे घेत आहे. ज्याला दाखवायचं आहे त्याला मी त्याच वेळी करुन दाखवतो. तुम्ही निवडणुकीसाठी तयारीला लागा,” अशा सूचना उद्धव ठाकरेंनी यावेळी पदाधिकाऱ्यांना दिल्या.

उद्धव ठाकरे काय म्हणाले –

“मी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसलो आहे. माझ्यावर वैयक्तिक टीका होत असून या टीकेला मी शांतपणे घेत आहे. ज्याला दाखवायचं त्याला मी त्याच वेळेला करून दाखवतो. आता येणाऱ्या निवडणुकीसाठी तयारीला लागा. मी माझ्या कामानेच माझी पोचपावती देतो,” असं उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सांगितलं. (political news)

उद्धव ठाकरेंनी यावेळी आपल्या विभागात झालेल्या काामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा अशीही सूचना दिली. आपण केलेल्या विकासकामाची पोचपावती मिळायला हवी, असं ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *