सोनहिरा कारखान्याची निवडणूक बिनविरोध

डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक ( sonhira fatory election ) बिनविरोध झाली. सलग सहाव्यांदा सोनहिऱ्याने बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम राहिली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी गणेश मरकड यांनी काम पाहिले. बिनविरोध संचालक मंडळात आमदार मोहनराव कदम, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम व सागरेश्वर सुतगीरणीचे अध्यक्ष शांताराम कदम यांचा समावेश आहे.

नवनिर्वाचित संचालक गटवार पुढीलप्रमाणे ( sonhira fatory election ) : मतदारसंघ क्र.1 : गट नं.1(सोनसळ तीन जागा) : डॉ.विश्वजित पतंगराव कदम (सोनसळ),रघुनाथ श्रीपती कदम (सोनसळ), प्रभाकर चंद्रु जाधव (आसद), मतदारसंघ क्र.1 : गट नं. 2 (चिंचणी तीन जागा): मोहनराव श्रीपती कदम (चिंचणी), पोपटराव दिनकर महिंद (देवराष्ट्रे), शांताराम मोहनराव कदम (चिंचणी), मतदारसंघ क्र.1 : गट नं. 3 (वांगी तीन जागा): सयाजी बाबुराव धनवडे (भाळवणी), दिलीपराव भगवान सूर्यवंशी (वांगी), निवृत्ती बापू जगदाळे (अंबक), मतदारसंघ क्र.1 : गट नं. 4 (कडेगाव तीन जागा) : भिमराव मारुती मोहिते (सोहोली), पंढरीनाथ विठोबा घाडगे (रायगाव), दीपक उर्फ पुरुषोत्तम शिवाजीराव भोसले (कडेगाव), मतदारसंघ क्र.1 : गट नं. 5 (खेराडे वांगी तीन जागा) : जालिंदर रामचंद्र महाडिक (नेवरी), युवराज पांडुरंग कदम (शेळकबाव), तानाजीराव नारायण शिंदे (चिखली), मतदारसंघ क्र.2 (संस्था गट एक जागा) : बापूसाहेब दत्तात्रय पाटील (सोनकिरे), मतदारसंघ क्र.3 (अनुसूचित जाती व जमाती गट एक जागा) : शिवाजी भिकू काळेबाग (येडे), मतदारसंघ क्र.4 (महिला गट दोन जागा) : शारदा दत्तात्रय कदम (खेराडे वांगी), सुनीता संभाजीराव जगताप (येवलेवाडी), मतदारसंघ क्र.5 (इतर मागासवर्गीय गट एक जागा) : जगन्नाथ गणपती माळी (शिरगाव),मतदारसंघ क्र.6 (भटक्या विमुक्त जाती व जमाती गट एक जागा) : शिवाजी जगन्नाथ गढळे (वडियेरायबाग).काँग्रेसचे दिवंगत नेते स्व डॉ पतंगराव कदम यांनी दूरदृष्टी ठेवून दुष्काळी कडेगाव तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सोनहिरा कारखान्याची स्थापना केली.कारखाना स्थापने पासून आतापर्यंत सलग सहव्यांदा कारखान्याची बिनविरोध निवडणुकीची परंपरा या निवडणुकीतही कायम राहिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *