मोदींचा ताफा अडकला तिथून पाकिस्तान फक्त १० किमी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल पंजाबमधील फिरोजपूर येथे सभा सुरक्षा (Security) यंत्रणेतील त्रुटींमुळे ऐनवेळी रद्द करण्यात आली. कार्यक्रमाच्या ठिकाणी रस्ते मार्गाने जाण्यासाठी निघालेल्या पंतप्रधान मोदींच्या ताफ्याला शेतकऱ्यांच्या निदर्शनामुळे एका फ्लायओव्हरवर २० मिनिटे थांबावं लागलं. त्यानंतर हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट होता असा आरोपही भाजपने केला.

काल झालेल्या या घटनेनंतर भाजपने पंजाब सरकार आणि काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. या सगळ्या घटनाक्रमाबद्दल आता पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी स्पष्टीकरण देत आपली बाजू मांडली आहे. नुकतेच काँग्रेस सोडून भाजपचा हात धरलेल्या कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी देखील यावरून गंभीर आरोप केलेले आहेत.

कॅप्टन यांनी मुख्यमंत्री चन्नी आणि पंजाबचे गृहमंत्री सुखजिंदरसिंग रंधवा यांच्या राजीनाम्याची मागणी केली. कारण पंतप्रधानांचा ताफा ज्या ठिकाणी अडकला होता, ते ठिकाण पाकिस्तानच्या सीमारेषेपासून फक्त १० किमी अंतरावर होतं. त्यामुळे पंतप्रधानांना आपण सुरक्षित मार्ग देऊ शकत नव्हता का? असा प्रश्न उपस्थित करत अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

पंतप्रधान मोदींचा प्रवास हवाई मार्गाने होईल असं ठरलेलं होतं. मात्र, खराब हवामानामुळे, ते राष्ट्रीय शहीद स्मारकाला भेट देण्यासाठी रस्ते मार्गाने निघाले होते. यासाठी त्यांना दोन तासांपेक्षा जास्त वेळ लागणार होता. असं गृह मंत्रालयाने सांगितलं. पंजाब पोलिसांकडून आवश्यक सुरक्षा (Security) व्यवस्थेची खात्री केल्यानंतरच, त्यांचा ताफा रस्त्याने पुढे गेला असंही गृह विभागाने सांगितलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *