‘या’ फळामध्ये आढळला कोरोना व्हायरस ! भीतीपोटी अनेक सुपरमार्केट बंद

कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंट (Omicron Variant) यावेळी त्याहूनही धोकादायक असल्याचे जगासमोर आले आहे. ओमिक्रॉनने जवळपास सर्वच देशांना वेठीस धरले आहे. आत्तापर्यंत ओमिक्रॉनबाबत जी माहिती समोर आली आहे त्यापैकी, एकाही ओमिक्रॉनचा संसर्ग कोणत्याही खाद्यपदार्थामधून झालेला आहे असा पुरावा सापडलेला नाही, पण दरम्यान, चीन मात्र याला अपवाद ठरला आहे. हो ! चीनमधील ड्रॅगन फ्रूटमध्येही कोरोना विषाणू (coronavirus) आढळल्याची बातमी समोर आली आहे. ही ड्रॅगन फळे व्हिएतनाममधून येतात. ही बातमी समोर आल्यानंतर चीनमधील अनेक सुपरमार्केट बंद करण्यात आल्या आहेत.

चीनच्या झेजियांग आणि जिआंगशी प्रांतातील नऊ शहरांमध्ये फळांच्या तपासणीत कोरोना विषाणूची पुष्टी झाली आहे. या रेपोर्टनंतर आता हे फळ खरेदी करणाऱ्यांनाही क्वारंटाईन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय परदेशातून येणाऱ्या खाद्यपदार्थांचीही तपासणी सुरू करण्यात आली आहे.

ड्रॅगन फळाच्या आयातीवर बंदी

ड्रॅगन फळामध्ये कोरोना असल्याची पुष्टी झल्यावर व्हिएतनाममधून ड्रॅगन फळ आयातीवर 26 जानेवारीपर्यंत बंदी घातली आहे. गेल्या आठवड्यात चीनमधील ड्रॅगन फ्रूटमध्ये कोरोनाव्हायरस आढळल्याची पुष्टी झाली होती. विशेष म्हणजे, चीनमधील शिआन शहरात कोरोना विषाणूची (coronavirus) प्रकरणे वाढल्यानंतर तेथे आधीच लॉकडाऊन आहे. यानंतर युझू शहरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *