कॅप्टन्सी गेली तरी विराट बेस्ट!

(sports news) विराट कोहलीने (Virat Kohli) टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडल्यानंतर त्याला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरूनही हटवण्यात आलं. विराट आता फक्त भारताच्या टेस्ट टीमचा कर्णधार आहे, तरीही त्याच्या लोकप्रियतेमध्ये अजिबात कमी झालेली नाही. विराट कोहली 2021 मध्ये हॉपर इन्स्टाग्राम रिच लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकाचा भारतीय आहे. तो प्रत्येक इन्स्टाग्राम पोस्टवर प्रचारासाठी 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे कमावतो.

विराट कोहली 2020 साली हॉपर इन्स्टाग्राम रिच लिस्टमध्ये 23 व्या क्रमांकावर होता. आता तो या यादीमध्ये 19 व्या क्रमांकावर आला आहे. प्रियांका चोप्रा हॉपर इन्स्टाग्राम रिच लिस्टमध्ये असलेली एकमेव इतर भारतीय होती. प्रियांका आंतरराष्ट्रीय स्तरावर या यादीत 27व्या क्रमांकावर राहिली. इन्स्टाग्रामवर प्रियांकाचे 64 मिलियन फॉलोअर्स आहेत. ती प्रत्येक इन्स्टाग्राम पोस्टसाठी 3 कोटी रुपये घेते.

विराट कोहलीचे इन्स्टाग्रामवर 177 मिलियन फॉलोअर्स आहेत, त्याची नेटवर्थ 950 कोटी रुपये (2021 अखेरपर्यंत) आहे. तसंच विराटची वर्षाची कमाई 130 कोटी रुपये आहे. ज्यामुळे विराट जगातला सगळ्यात श्रीमंत क्रिकेटपटू बनला आहे.

याहू च्या 2021 च्या इंडिया इयर-एंडर लिस्टमध्ये विराट सर्वाधिक सर्च झालेला भारतीय खेळाडू होता. 33 वर्षीय विराटनंतर या यादीत एमएस धोनी आणि टोकयो ऑलिम्पिक स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकणारा नीरज चोप्रा आहेत.

विराट कोहली मागच्या सप्टेंबर महिन्यात इन्स्टाग्रामवर 150 मिलियन फॉलोअर्सपर्यंत पोहोचणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू आणि सेलिब्रिटी बनला आहे.(sports news)

विश्व स्तरावर क्रीडा विश्वात विराट कोहली चौथा क्रमांकावर आहे. विराटच्या पुढे पोर्तुगालचा महान फूटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो, अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी आणि ब्राझीलचा नेमार ज्युनियर आहे.

बीसीसीआयच्या करारानुसार विराट कोहली ए प्लस ग्रेडमध्ये आहे, ज्यामुळे त्याचा वर्षाचा पगार 7 कोटी रुपये आहे. याशिवाय विराटला वेगवेगळ्या फॉरमॅटच्या प्रत्येक मॅचसाठी वेगळं मानधन मिळतं.

विराटने आयपीएल 2021 पर्यंत आयपीएलमध्ये आरसीबीकडून 17 कोटी रुपये घेतले, पण आयपीएल 2022 साठी त्याने आपली किंमत कमी केली आणि 15 कोटी रुपये घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *