बँकेनं चुकून ग्राहकांच्या खात्यात पाठवलं तब्बल 1300 कोटी

बँकेनं अचानक तुमच्या खात्यात लाखो, कोटी रुपये पाठवले, तर तुम्ही काय कराल? हे ऐकायला खूप इंटरेस्टिंग वाटतंय ना! असाच काहीसा प्रकार ब्रिटनमध्ये घडलाय. वास्तविक, यूकेच्या सँटेंडर बँकेनं (Santander Bank) चुकून बँकेच्याच 2 हजार खात्यांमधून 75 हजार लोकांना रक्कम पाठवलीय. एकूण 130 दशलक्ष पौंड म्हणजेच, सुमारे 1300 कोटी रुपये पाठवण्यात आले आहेत. आता बँक हे पैसे परत मागत आहे; पण लोक ते पैसे परत करायला तयार नाहीत. 25 डिसेंबर रोजी सँटेंडर बँकेत हा घोळ झाला होता.विशेष बाब म्हणजे सँटेंडरचे हे पैसे बार्कलेज (Barclays), एचएसबीसी (HSBC), नॅटवेस्ट, को-ऑपरेटिव्ह बँक आणि व्हर्जिन मनी या प्रतिस्पर्धी बँकांच्या ग्राहकांच्या खात्यात गेले आहेत. डेली मेलच्या वृत्तानुसार, हे पैसे बँकेत परत जाणार नाहीत, अशी भीती सँटेंडर बँकेलाही आहे. मात्र, बँकेकडं पैसे परत मिळवण्याचे दोन मार्ग आहेत. पहिला, बँक जबरदस्तीनं ग्राहकांना पैसे परत पाठवण्यास सांगेल. तर दुसरा पर्याय म्हणजे, त्या ग्राहकांकडं जाऊन रक्कम वसूल करु शकते. बँकेकडून एक स्टेटमेंटही आलंय, त्यात तांत्रिक बिघाडामुळं हा सर्व प्रकार घडल्याचं म्हटलंय.यूकेच्या कायद्यानुसार, ग्राहकाच्या खात्यात चुकून जमा झालेले पैसे बँका परत घेऊ शकतात. जर ग्राहकांनी पैसे परत केले नाहीत, तर त्यांना जास्तीत-जास्त 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. या बँकेचे यूकेमध्ये सुमारे 14 दशलक्ष ग्राहक आणि 616 शाखा आहेत. सॅंटेंडर यूके ही ग्लोबल बँक बँको सॅंटेंडरची सहयोगी बँक आहे. याआधी, अमेरिकेच्या सिटी बँकेनं देखील कॉस्मेटिक कंपनी रेव्हलॉनच्या (Revlon) कर्जदारांना चुकून $900 दशलक्ष पाठवले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *