केंद्राच्या दाव्यानुसार देशात रोजगार वाढले

कोरोना संकटामुळे (corona crisis) आर्थिक व्यवहारांना आणि पर्यायाने रोजगाराला फटका बसल्याची चिंता व्यक्त होत असताना श्रम मंत्रालयाच्या दाव्यानुसार देशात रोजगारांमध्ये मोठी वाढ झाली आहे. वर्तमान आर्थिक वर्षाच्या (२०२१-२२) दुसऱ्या तिमाहीत म्हणजेच (जुलै – सप्टेंबर- २०२१) या कालावधीत दोन लाख लोकांना(corona crisis) रोजगार मिळाल्याचे श्रम मंत्रालयाकडून सांगण्यात आले. (Corona Period Jobs)

श्रम मंत्रालयाचा आस्थापनांशी संबंधित दुसरा त्रैमासिक सर्वेक्षण अहवाल आज केंद्रीय श्रममंत्री भूपेंद्र यादव यांनी प्रकाशित केला. कृषी व्यतिरिक्त उर्वरित आस्थापनाप्रकारापैकी उत्पादन, बांधकाम, व्यापार, वाहतूक, शिक्षण, आरोग्य, निवास आणि उपाहारगृहे, माहिती तंत्रज्ञान/बीपीओ आणि आर्थिक बाबींशी (corona crisis) संबंधित सेवा या नऊ निवडक क्षेत्रांमधील रोजगाराच्या अध्ययनाचा यात समावेश आहे.

पहिल्या तिमाहीचा अहवाल मागील वर्षी २७ सप्टेंबरला जाहीर करण्यात आला होता. त्यात या नऊ क्षेत्रांमध्ये सहाव्या आर्थिक जनगणना अहवालात (२०१३-१४) दिसलेल्या एकूण २.३७ कोटी रोजगारांच्या तुलनेत २९ टक्क्यांनी वाढ (corona crisis) झाल्याचे आणि एकूण रोजगार सुमारे ३.०८ कोटीपर्यंत पोहोचल्याचे आढळून आले होते. त्यापार्श्वभूमीवर दुसऱ्या त्रैमासिक अहवालानुसार जुलै ते सप्टेंबर या कालावधीमध्ये दोन लाख रोजगार वाढले असून एकूण रोजगार ३.१० कोटी झाले आहेत

सर्वाधिक रोजगार उत्पादन क्षेत्रात वाढले आहेत. या क्षेत्रातील रोजगाराचे प्रमाण ३९.१ टक्के असल्याचे दिसून आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *