विराट- ऋषभने डाव सावरला, भारताला १६५ धावांची आघाडी

सलग दाेन विकेट गमावल्‍यानंतर कर्णधार विराट काेहली आणि ऋषभ पंत यांनी भारताचा डाव सावरला. केपटाउन कसोटीत दुसर्‍या डाव्‍यात ऋषभ पंतचे दमदार अर्धशतक झळकावले. त्‍याच्‍या आश्‍वासन खेळीने भारताने १४३ धावांची आघाडी घेतली आहे. विराट काेहली आणि ऋषभ पंत यांनी १४२ चेंडूत ६९ धावांची भागीदारी केली. ऋषभ पंत याने केवळ ५८ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. भारताने तिसर्‍या दिवशी दुसर्‍या डावात लंचपर्यत ४ गडी गमावत १३० धावा केल्‍या आहेत. विराट काेहली आणि ऋषभ पंत यांनी १४२ चेंडूत ७० धावांची भागीदारी केली.केपटाउन कसोटीत ( India vs S Africa Captown Test ) तिसर्‍या दिवसाच्‍या पहिल्‍याच षटकात भारताला धक्‍का बसला.पहिल्‍या षटकाच्‍या दुसर्‍या चेंडूवर मार्को जेन्‍सन याने चेतश्‍वर पुजाराला बाद केले. कीगन पीटरसन याने पुजाराच अप्रतिम झेल पकडला. पुजारापाठाेपाठ एक धावावर अजिंक्‍य रहाणेला वेगवान गाेलंदाज रबाडाने तंबूत धाडले.ऋषभ पंत आपला नैसर्गिक खेळ करत आहे एका षटकात दाेन चाैकार फटकावले. त्‍याने दक्षिण आफ्रिकेच्‍या गाेलंदाजाचा दबाव झुगारण्‍याचा प्रयत्‍न केला. भारताने चार फलंदाज गमावत ८३ धावांची आघाडी घेतली आहे. आता कर्णधार विराट काेहलीवर भारताचा डाव सावरण्‍याची माेठी जबाबदारी आहे. विराट १६ धावांवर तर पंत १० धावांवर खेळत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *