अखेर केपटाऊनमध्ये टीम इंडियाने रचला अनोखा रेकॉर्ड!
(sports news) टीम इंडिया विरूद्ध दक्षिण आ आफ्रिका यांच्यातील तिसरी आणि निर्णायक कसोटी केपटाऊनमध्ये सुरु आहे. दरम्यान या केपटाऊन कसोटीत एका वर्ल्ड रेकॉर्डची नोंद झाली आहे. भारतीय खेळाडूंनी त्यांच्या कामगिरीने हा वर्ल्डरेकॉर्ड केला आहे. यामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाज आणि फिल्डर्सनेही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारतीय खेळाडूंनी जे केलं ते कसोटी क्रिकेटमध्ये यापूर्वी कधीही घडलं नव्हतं.
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच टीमच्या दोन्ही डावांमध्ये सर्व 20 विकेट्स या कॅच आऊट झाल्याची नोंद करण्यात आली आहे. कॅच घेतल्याने या सर्व 20 विकेट्स गेल्याने हा वर्ल्डरेकॉर्ड केपटाऊन कसोटीत झाला आहे. या सामन्यात भारतीय टीमच्या दोन्ही डावातील 20 विकेट्स कॅच आऊटमुळे गेलेत.
यापूर्वी, कसोटी इतिहासात असं 5 वेळा घडलं आहे. मात्र यापूर्वी एका टीमच्या दोन्ही डावात कॅच आऊटमुळे 19 विकेट्स झाल्याची नोंद आहे. 2019-20 मध्ये केपटाऊनमध्येच दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातील कसोटीत या रेकॉर्डची पुनरावृत्ती झाली होती. त्या सामन्यात दक्षिण आफ्रिका टीमच्या दोन्ही डावांमध्ये 19 विकेट्स कॅट केल्यामुळे झाल्या होत्या.
5 कसोटीत 19 विकेट्स कॅचआऊटमुळे
इंग्लंड विरूद्ध ऑस्ट्रेलिया- ब्रिस्बेन टेस्ट 1982/83
पाकिस्तान विरूद्ध ऑस्ट्रेलिया- सिडनी टेस्ट 2009/10
इंडिया विरूद्ध दक्षिण आफ्रिका- डरबन टेस्ट 2010/11
इंग्लंड विरूद्ध ऑस्ट्रेलिया- ब्रिस्बेन टेस्ट 2013/14
दक्षिण आफ्रिका विरूद्ध इंग्लंड- केपटाऊन टेस्ट 2019/20
भारताकडे इतिहास रचण्याची संधी
केपटाऊन कसोटीत टीम इंडियाने पहिल्या डावात 223 आणि दक्षिण आफ्रिकेने 210 रन्स केले होत्या. 13 रन्सची आघाडी घेत टीम इंडियाने दुसऱ्या डावात 198 रन्स करत 212चं लक्ष्य ठेवलंय. (sports news)
दोन्ही संघांमधील तीन कसोटी सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. केपटाऊन कसोटी निर्णायक आहे. अशा स्थितीत भारतीय भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेत पहिली कसोटी मालिका जिंकण्याची संधी आहे.