विराट कोहलीने आपला इगो बाजूला ठेवला पाहिजे
विराट कोहलीने (Virat Kohli) दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका २ – १ ने हरल्यानंतर आपल्या कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत कसोटी संघाचे नेतृत्व सोडले. विराटने नेतृत्व सोडल्यानंतर क्रीडा विश्वातून अनेक दिग्गजांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. आता भारताचे माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनीदेखील विराटच्या कॅप्टन्सी सोडण्याबाबतच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. (Kapil Dev Reaction Over Virat Kohli Stepping Down Test Captaincy)कपिल देव यांनी विराटच्या निर्णयाचे स्वागत केले. ते म्हणाले की, विराट (Virat) आपले नेतृत्व एन्जॉय करु शकत नव्हाता. हा निर्णय घेणे खूप कठीण असते. कपिल देव पुढे म्हणाले की, ‘तो एक परिपक्व व्यक्ती आहे. इतका महत्वाचा निर्णय घेण्यापूर्वी त्याने खूप विचार केला असणार. कदाचित तो त्याचे नेतृत्व एन्जॉय करत नव्हता. आपण त्याला पाठिंबा दिला पाहिजे आणि त्याला शुभेच्छाही दिल्या पाहिजेत.’कपिल देव हे देखील देखील काही काळ कृष्णमचारी श्रीकांत (Krishnamachari Srikkanth) आणि मोहम्मद अझरुद्दीन (Mohammad Azharuddin) यांच्या नेतृत्वाखाली खेळले होते. विराटनेही तसेच करावे असे त्यांना वाटते. कपिल देव याबाबत म्हणाले, ‘सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) देखील माझ्या नेतृत्वाखाली खेळले आहेत. मी श्रीकांत आणि अझरुद्दीन यांच्या नेतृत्वाखाली खेळलो आहे. मला कोणताही इगो नव्हता. विराटला त्याचा इगो (Virat Kohli Ego) बाजूला ठेवायला हवा आणि तरुण खेळाडूंच्या नेतृत्वाखाली खेळायला हवे. यामुळे त्याचा आणि भारतीय क्रिकेटचा फायदाच होईल. विराट नव्या कर्णधाराला मार्गदर्शन करु शकतो. आपण विराट कोहलीला एक फलंदाज म्हणून गमावू शतक नाही. कदापी नाही.’
गेल्या महिन्यात विराट कोहलीला काढून रोहित शर्माकडे एकदिवसीय संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. त्यानंतर आता विराट कोहलीने कसोटीचे नेतृत्वही सोडले आहे. रोहित शर्माला कसोटी संघाचे उपकर्णधारपद देण्यात आले होते. मात्र भारतीय संघ (Indian Cricket Team) घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध रोहित शर्मा नेतृत्व करतो की कोणा युवा खेळाडूंच्या गळ्यात कसोटी कर्णधारपदाची माळ पडते हे पहावे लागले.