IPL 2022 ला आणखी एक झटका

(sports news) अ‍ॅशेस मालिकेत (Ashes Series) ऑस्ट्रेलियाकडून (Australia) झालेला 4-0 पराभव इंग्लिश खेळाडूंच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. या पराभवासाठी इंग्लंडमधल्या काही क्रिकेट तज्ज्ञांनी भारतात होणाऱ्या IPL स्पर्धेला जबाबदार धरलं आहे. इंग्लंडचा आणि जागतिक क्रिकेटमधील सध्याच्या घडीचा सर्वोत्तम अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सने (Ben Stokes) यंदाच्या आयपीएलमधून माघार घेतली आहे. कामगिरीत सुधारणा आणि पुढच्या सीजनमध्ये मायदेशात होणाऱ्या मालिकेसाठी स्वत:ला सज्ज ठेवण्यासाठी स्टोक्सने हा निर्णय घेतला आहे. ब्रिटिश माध्यमांनी हे वृत्त दिलं आहे.

खराब कामगिरीमुळे त्याने आपला निर्णय बदलला

याआधी जो रुटनेही आयपीएलपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला. अलीकडेच रुटने आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये सहभागी होण्याचा विचार करत असल्याचं म्हटलं होतं. पण इंग्लिश संघाच्या खराब कामगिरीमुळे त्याने आपला निर्णय बदलला. रुट पाठोपाठ आता बेन स्टोक्सनेही तसाच निर्णय घेतला आहे.

त्याने फक्त 236 धावा केल्या

बंगळुरुत फेब्रुवारी महिन्यात मेगा ऑक्शन पार पडणार आहे. बेन स्टोक्सने नुकत्याच संपलेल्या अ‍ॅशेस मालिकेत लौकीकाला साजेशी कामगिरी केली नाही. त्याने फक्त 236 धावा केल्या व चार विकेट घेतल्या. इंग्लंडचा माजी कर्णधार डेविड गॉवर यांच्यासह अनेक जण इंग्लिश खेळाडूंच्या खराब कामगिरीसाठी आयपीएलला जबाबदार ठरवत आहेत. “स्टोक्स यावर्षीच्या स्पर्धेत सहभागी होणार नाही. पहिल्यांदाच आयपीएलमध्ये 10 टीम्स खेळणार आहेत” असे लंडनच्या इव्हिनिंग स्टँडर्डने म्हटले आहे. (sports news)

कोविडमुळे स्पर्धा मध्येच थांबवण्यात आली होती

2021 च्या मोसमात बेन स्टोक्स राजस्थान रॉयल्सचा भाग होता. कोविडमुळे स्पर्धा मध्येच थांबवण्यात आली होती. सप्टेंबरमध्ये पुन्हा स्पर्धा सुरु झाली, त्यावेळी स्टोक्स खेळण्यासाठी परतलाच नाही. कसोटी क्रिकेटमधुन निवृत्ती घेणारा मोइन अली आणि जोस बटलर यांना त्यांच्या फ्रेंचायजीने रिटेन केले आहे. म्हणजे ते त्यांच्या फ्रेंचायजीकडून खेळतील. मोइन अली आणि बटरला चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सने दोघांना रिटेन केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *