टीम इंडियाला दिलासा, दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज मालिकेतून आऊट
(sports news) दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या पहिल्या वन-डेपूर्वी (India vs South Africa 1st Odi) टीम इंडियाला मोठा दिलासा मिळाला आहे. आफ्रिकेचा प्रमुख फास्ट बॉलर कागिसो रबाडा (Kagiso Rabada) या मालिकेत खेळणार नाही. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डानं रबाडाला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. रबाडा, लुंगी एन्गिडी आणि मार्को जेन्सन या फास्ट बॉलर्सच्या जोरावर आफ्रिकेनं टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडियाचा पराभव केला होता. रबाडाने या सीरिजमध्ये सर्वात जास्त 20 विकेट्स घेतल्या होत्या.
रबाडाच्या जागेवर टेस्ट क्रिकेटमध्ये 19 विकेट्स घेणारा मार्को जेन्सन वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पण करेल. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांची वन-डे मालिका 19 जानेवारीपासून पार्लमध्ये सुरू होणार आहे. या मालिकेत नियमित कॅप्टन रोहित शर्माच्या (Rohit Sharma) अनुपस्थितीमध्ये केएल राहुल (KL Rahul) टीम इंडियाचा कॅप्टन आहे.
क्रिकेट दक्षिण आफ्रिकेनं याबाबत जाहीर केलेल्या वक्तव्यामध्ये म्हंटलं आहे की, ‘फास्ट बॉलर कागिसो रबाडाला भारताविरुद्ध होणाऱ्या वन-डे मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. गेल्या काही काळापासून त्याच्यावर कामाचा दबाव जास्त आहे. न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या आगामी टेस्ट सीरिजसाठी तो फ्रेश राहावा अशी आमची इच्छा आहे.’ रबाडाच्या जागी अन्य कोणत्याही खेळाडूचा टीममध्ये समावेश करण्यात आलेला नाही. (sports news)
एनरिक नॉर्खियानंतर रबाडा देखील ही मालिका खेळणार नसल्यानं टीम इंडियाला जिंकण्याची मोठी संधी आहे. टीम इंडियाकडे सिसांदा मगाला, एंडिले फेहलुकवायो, ड्वेन प्रिटोरियस आणि वेन पार्नेल हे फास्ट बॉलर्स आहेत. त्यांचा सामना भारतीय बॅटर कसा करतात यावर मालिकेचे भवितव्य अवलंबून असेल.
दोन्ही टीम या प्रकारे आहेत
टीम इंडिया : केएल राहुल ( कॅप्टन ), जसप्रीत बुमराह, शिखर धवन, ऋतुराज गायकवाड़, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, ऋषभ पंत, ईशान किशन, युजवेंद्र चहल, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, जयंत यादव आणि नवदीप सैनी.
दक्षिण अफ्रीका : तेम्बा बावूमा ( कॅप्टन ), केशव महाराज, क्विंटोन डिकॉक, जुबैर हमजा, मार्को जेनसन, जानेमन मलान, सिसांडा मगाला, एडेन मार्कराम, डेविड मिलर, लुंगी एन्गिडी, वेन पार्नेल, एंडिले फेहलुकवायो, ड्वेन प्रिटोरियस, तबरेज शम्सी, रासी वान डेर डुसेन आणि काइल वेरेन्ने.