बुमराहचा द. आफ्रिकेला पहिला झटका, मलान बाद

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात यजमान द. आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांची सुरुवात खराब झाली आणि पावव्याच षटकात त्यांनी पहिली विकेट गमावली. सध्या संघाची धावसंख्या ५ षटकांत १ बाद २३ आहे. व्यंकटेश अय्यरला भारताकडून वनडे पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. यासोबतच आर अश्विनने ५ वर्षांनंतर वनडे प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन केले आहे.भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात यजमान द. आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांची सुरुवात खराब झाली आणि पावव्याच षटकात त्यांनी पहिली विकेट गमावली. सध्या संघाची धावसंख्या ५ षटकांत १ बाद २३ आहे. व्यंकटेश अय्यरला भारताकडून वनडे पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. यासोबतच आर अश्विनने ५ वर्षांनंतर वनडे प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन केले आहे.दक्षिण आफ्रिकेविरुद्‍धची कसोटी मालिका गमावल्‍यानंतर आज (दि. १९) टीम इंडिया वन डे मालिकेतील (IND vs SA ODI ) पहिला सामना खेळत आहे. ऑक्‍टोबर २०१६ पासून प्रथमच विराट कोहली याच्‍या नेतृत्‍वाविना टीम इंडिया मैदानात उतरली आहे. तब्‍बल पाच वर्षांनंतर विराट हा एक खेळाडू म्‍हणून संघात आहे. विराटकडे कर्णधारपद नसले तरी त्‍याच्‍या खेळीकडे क्रिकेट चाहत्‍यांचे लक्ष आहे. तसेच के. एल. राहुलसोबत ओपनिंगला शिखर धवन येणार की ऋतुराज गायकवाड? याची चाहत्‍यांना उत्सुकता आहे.

भारत संघ : केएल राहुल ( कर्णधार ), शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्‍यर, ऋषभ पंत (यष्‍टीरक्षक), वेंकटेश अय्‍यर, शार्दुल ठाकुर, आर. अश्‍विन, भुवनेश्‍वर कुमार, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल

दक्षिण आफ्रिका संघ ; क्‍विंटन डिकॉक, जे. मलान, एडेन मार्करम, रसी वानर्र डुसन, टेम्‍बा बावुमा ( कर्णधार ), डेव्‍हिड मिलर, एंडिले फेहलुकवायो, मार्को जेन्‍सन, केशव महाराज, तबरेज शम्‍सी, लुंगी एन्‍गिडी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *