टीम इंडियाला मोठा झटका

(sports news) सध्या ICC U19 वर्ल्डकप सुरु आहे. या वर्ल्डकपमध्ये (Under-19 World Cup) टीम इंडियातील खेळाडूंची RT-PCR आणि रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली. यानंतर टीम इंडियामध्ये खेळाडू कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. बुधवारी आयर्लंडविरुद्ध (India vs Ireland)च्या मॅचदरम्यान 17 खेळाडूंपैकी सहा खेळाडूंना वगळण्यात आलं. U-19 टीमचा कर्णधार यश धुल, उपकर्णधार शेख रशीद आणि त्यांचे चार सहकारी कोविड-19 पॉझिटिव्ह आले आहेत. ज्यामुळे त्यांना आयर्लंडविरुद्धच्या सामन्याला मुकावं लागलं.

धूल आणि रशीद व्यतिरिक्त, सिद्धार्थ यादव, मानव पारख, वासू वत्स, आराध्या यादव यांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्यामुळे टीम इंडिया केवळ 11 खेळाडूंना आयर्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी मैदानात उतरवू शकला.

सहा खेळाडूचं मेडिकल स्टेटस खालीलप्रमाणे

सिद्धार्थ यादव – RT-PCR चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
मानव पारख – लक्षणे दर्शविली आहेत. त्याच्या RT-PCR चाचणीच्या रिपोर्टची प्रतीक्षा आहे. रॅपिड अँटीजेन चाचणीचा रिपोर्ट नकारात्मक आला आहे.
वसु वत्स – लक्षणे दर्शविली आहेत. त्याच्या RT-PCR चाचणीच्या रिपोर्टची प्रतीक्षा आहे. रॅपिड अँटीजेन चाचणीचा रिपोर्ट नकारात्मक आला आहे.
यश धुल – रॅपिड अँटीजेन चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
आराध्या यादव – रॅपिड अँटीजेन चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
एसके रशीद – रॅपिड अँटीजेन चाचणीचा निकाल पॉझिटिव्हआला आहे.
बोर्ड परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि व्यवस्थापन आणि कोचिंग ग्रुपच्या संपर्कात आहे. (sports news)

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) एका अधिकाऱ्याने PTI सांगितलं की, भारतातील तीन खेळाडू काल पॉझिटिव्ह आढळले होते आणि त्यांना आधीच आयसोलेशनमध्ये पाठवण्यात आलं होतं. सामन्याच्या आधी सकाळी कर्णधार आणि उपकर्णधार यांचीही अँटीजेन चाचणी पॉझिटिव्ह आली जी निर्णायक नव्हती. त्यामुळे खबरदारी म्हणून त्याला सामन्यातून वगळण्यात आलं. या खेळाडूंमध्ये कर्णधार यश धुल आणि उपकर्णधार शेख रशीद यांचाही समावेश आहे. फक्त 11 खेळाडू उपलब्ध आहेत आणि सहा खेळाडू आयसोलेशनमध्ये आहेत. धुल आणि राशिद दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात खेळले होते पण आराध्या त्या सामन्याचा भाग नव्हता. धुलच्या गैरहजेरीत निशांत सिंधू यानं टीम इंडियाचं नेतृत्व केलं.

खेळाडू कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खेळाडू पॉझिटिव्ह खेळाडूंच्या संपर्कात आले, यानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून त्यांना आयसोलेट करण्यात आलं. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता. भारताने सर्वाधिक 4 वेळा अंडर-19 वर्ल्ड कप जिंकला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *