१२ वी पास उमेदवारांना संधी, CISF मध्ये ११४९ पदांसाठी भरती

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (CISF) कॉन्स्टेबल (CONSTABLE/FIRE) पदांच्या एकूण ११४९ जागांसाठी भरती केली जात आहे. त्यासाठी सीआयएसएफने अधिसूचना जारी केली आहे. यासाठी आज २९ जानेवारी ते ४ मार्च दरम्यान अर्ज करण्यासाठी मुदत आहे. या पदासांठी २१,७०० – ६९,१०० रुपये अशी वेतनश्रेणी आहे. शारीरिक, लेखी आणि वैद्यकीय चाचणी केल्यानंतर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या पदासांठी केवळ ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातून ६३ आणि नक्षलग्रस्त भागांतून ७ पदे भरली जाणार आहेत. तर कर्नाटकासाठी ३४ पदे रिक्त आहे.
वयोमर्यादा : या पदांसाठी १८-२३ वर्षे अशी वयोमर्यादा आहे.

शैक्षणिक पात्रता : उमेदवार विज्ञान विषयासह मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून १२वी उत्तीर्ण असावा.

Physical Standards : उंची -१७० सेमी

छाती -८०-८५ सेमी (Minimum expansion 5 Cms)

अधिक माहितीसाठी सीआयएसएफच्या www.cisfrectt.in या वेबसाइटवर संपर्क साधावा.

CISF Constable Recruitment : अर्ज कसा करावा
पहिल्यांदा उमेदवाराने सीआयएसएफच्या www.cisfrectt.in या अधिकृत वेबसाइटवर जावे.
होम पेजवर Recruitment सेक्शनवर क्लिक करा.
भरतीची संबंधित सर्व माहिती वाचून झाल्यानंतर नोंदणी करावी.
आता आयडी आणि पासवर्डच्या माध्यमातून लॉगिन करा.
मागितलेली सर्व माहिती भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
अर्ज शुल्क भरून सबमिट बटनावर क्लिक करा.
अर्ज डाउनलोड करुन त्यांची प्रिंट काढू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *