डी के टी ई वाय सी पी च्या १० विद्यार्थ्यांची टाटा टेक्नॉलॉजीज लि. पुणे या नामांकित कंपनीत निवड वार्षिक ४.१५ लाख पॅकेजवर निवड
इचलकरंजी येथील डी के टी ई सोसायटीच्या यशवंतराव चव्हाण पॉलीटेक्निकच्या कॅम्पस मधुन १० विद्यार्थ्यांची टाटा टेक्नॉलॉजीज कंपनी लि. पुणे या नामांकित कंपनीत निवड झाली आहे.
सदरच्या कॅम्पस मध्ये वाय सी पी च्या तृतीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग मधील सलोनी रवंदे, ऋतुजा बोरगावे, तृतीय वर्ष इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधील कुणाल मनोळे, आर्यन रजपूत, विश्व़जीत घोटणे, अंकिता मोहिते, प्रफुल्ल नंदाळे, कुसुम पाटील, अमृता पाटील, मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधील फरदीन सय्यद यांची वार्षिक ४.१५ लाख रुपये पॅकेजवर निवड झाली आहे.
टाटा टेक्नॉलॉजीज लि. ही कंपनी भारतातील सर्वात मोठ्या समुहापैकी एक जागतिक अभियांत्रिकी कंपनी आहे. ऑटोमोटिव्ह, एरोस्पेस, औद्योगिक यंत्रसामग्री आणि आरोग्य सेवा यांसारख्या विविध उद्योगांची पूर्तता करते व उत्पादन उद्योगाला सेवा प्रदान करते.
टाटा टेक्नॉलॉजीज लि. कंपनीतर्फे नुकताच कॅम्पस इंटरव्यूव आयोजित केला होता. त्यामधून कॅम्पस इंटरव्यूव प्रोसेस मध्ये टेक्निकल राऊंड एप्टीट्यूड टेस्ट तसेच पर्सनल एचआर इंटरव्यूव इत्यादी फेऱ्या घेण्यात आल्या त्यानंतर विद्यार्थ्यांची निवड झाली.
डीकेटीईमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी राबविण्यात येणारे सॉफ्टस्कील प्रोग्रामस, देण्यात येणारे इंडस्ट्रीयल प्रशिक्षण, इंडस्ट्री भेटी, गेस्ट लेक्चर्स या सर्वांचा फायदा या विद्यार्थ्यांना होत असतो.
विद्यार्थ्यांच्या नामांकित कंपनीतील या निवडीने डीकेटीईच्या दर्जेदार तंत्रशिक्षणावर गुणवत्तेची मोहोर उमटवली आहे. विद्यार्थ्यांच्या सातत्याने होणाऱ्या निवडीने पॉलीटेक्निकने तंत्रशिक्षणातील वेगळी ओळख निर्माण केली असल्याचे मनोगत मानत सचिव डॉ. सपना आवाडे यांनी व्यक्त केले.
संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे व सर्व संचालकांचे सहकार्य लाभले.
सदरच्या विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. ए. पी. कोथळी, उपप्राचार्य प्रा. बी. ए. टारे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर एम. बी. चौगुले डीकेटीई च्या कार्यकारी संचालिका डॉ. एल. एस. आडमुठे, विभाग प्रमुख व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.