“मोदींपेक्षा मोठा हिंदू कोण, याचीच योगी-अखिलेशमध्ये स्पर्धा”

 

देशातील सर्वात मोठं राज्य असणाऱ्या उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) विधानसभा निवडणुकांकडे (Assembly Elections 2022) संपुर्ण देशांचं लक्ष लागून आहे. भाजप, सपा, आप, बसपासह स्थानिक पक्षांशी युती करत एमआयएमने (MIM) देखील या निवडणुकांमध्ये उडी घेतलेली आहे. एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी याच पार्श्वभूमीवर एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधला असता, उत्तर प्रदेशमध्ये फक्त हिंदुंना खुष करण्याची स्पर्धा लागली असल्याचं म्हणत त्यांनी योगी आदित्यनाथ आणि अखिलेश यादव यांच्यावर टीका केली आहे.

“उत्तर प्रदेशमध्ये सामाजिक न्यायाबद्दल नाही तर योगी किंवा अखिलेश यांच्यात मोठा हिंदू कोण, ही लढाई सुरू आहे. दोघंही मोदींपेक्षा मोठे हिंदू होण्याची स्पर्धा करत आहेत. कोणी एका मंदिराबद्दल बोलत असेल, तर दुसराही वेगळ्या मंदिराबद्दल बोलतो” असं मत असदुद्दीन ओवैसी यांनी व्यक्त केलं आहे.

उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीसाठी (UP Assembly Eelections 2022) ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (AIMIM) अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) आणि जन अधिकार पक्षाचे बाबू सिंह कुशवाह (Babu Singh Kushwaha) यांच्यासह मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक समुदाय कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष वामन मेश्राम (Waman Meshram) यांनी शनिवारी ‘भागीदारी परिवर्तन मोर्चा’ ही नवीन आघाडी स्थापन केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *