नितेश राणेंच्या अटकेसाठी पोलिसांची दादागिरी;
सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयानं (Sindhudurg District Court) भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांना जोरदार दणका दिला आहे. त्यांचा नियमित जामीन अर्ज सुद्धा नामंजूर (Nitesh Rane Petition) केला आहे. आम्ही उच्च न्यायालयात (High court) जाणार असल्याचं नितेश राणेंनी सांगितलं आहे. पण, त्यापूर्वी पोलिसांनी त्यांची गाडी रोखली आणि त्यावेळी राणे यांनी पोलिसांशी हुज्जत घातल्याचं समोर आलंय. यावेळी नितेश राणे यांच्या वकील सतीश मानशिंदेनी पोलिसांकडून दादागिरी होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
नितेश राणे यांची गाडी पोलिसांनी अडवली होती. न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ते जात असताना पोलिसांनी त्यांच्यासमोर आपल्या गाड्या लावल्या. यामुळे माजी खासदार निलेश राणे आक्रमक झाले आहेत. थांबविण्याचे आदेश दाखवा, अशी त्यांनी मागणी केली आहे. भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले आहेत. कुठल्या अधिकाराखाली थांबवलं, असं निलेश राणेंनी म्हटलं आहे.