युग संपले, भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन

गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचं निधन झालं आहे. मुंबईतील (Mumbai) ब्रीच कँडी रुग्णालयात (hospital) (Breach Candy) उपचार सुरु शनिवारपासून प्रकृती ढासळलल्यानं त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. कोरोना आणि न्यूमोनिया झाल्यानं त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या 28 दिवसांपासून लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी (Breach Candy Hospital) रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लतादिदींची प्रकृती पुन्हा बिघडली असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं, असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. लता मंगेशकर यांच्या प्रकृतीसाठी देशभरातून प्रार्थना सुरु आहेत. डॉक्टरांच्या (hospital) विशेष टीमच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. डॉ. प्रतीत समदानी यांनी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली होती. लता मंगेशकर या कोरोना आणि न्यूमोनियातून मुक्त झाल्याची माहिती महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.

जगभरातील कोट्यवधी संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारे अलौकिक स्वर आज हरपले. लतादीदींच्या आवाजाच्या परीसस्पर्शाने अजरामर झालेल्या गीतांच्या माध्यमातून हा स्वर आता अनंतकाळ आपल्या मनांमध्ये गुंजन करत राहील, अशा शब्दात शरद पवार यांनी लतादीदींबद्दल भावना व्यक्त केल्या.

भारताची शान निघून गेली. भारताचा आवाज गेला. कोणत्या शब्दात बोलू हे मला समजत नाही. दीदींना भारतातील आणि जगातील कोणताही माणूस विसरु शकत नाही, असं ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *