मोहीम फत्ते : भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स यांनी इतिहास रचला
भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी बुधवारी (दि.५) तिसऱ्यांदा अंतराळात यशस्वी उड्डाण केले. सुनिता आणि त्यांच्या एका सहकाऱ्याने बोईंग कंपनीच्या स्टारलाइनर अंतराळयानातून यशस्वी उड्डाण केले. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले सदस्य बनून सुनिता विल्यम्स यांनी नवीन इतिहास (Sunita Williams) रचला आहे.
विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना घेऊन जाणारी बोईंगची क्रू फ्लाइट चाचणी मोहीम अनेक विलंबानंतर फ्लोरिडामधील केप कॅनाव्हेरल स्पेस फोर्स स्टेशनवरून प्रक्षेपित करण्यात आली. अशा मोहिमेवर उड्डाण करणारी पहिली महिला म्हणून भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक सुनीता विल्यम्स (Sunita Williams) यांनी इतिहास घडवला आहे.
तिसऱ्या प्रयत्नात अंतराळयान मोहीम फत्ते
यापूर्वी भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स अंतराळ प्रवासाला तिसऱ्यांदा शनिवारी (दि.१ जून) जाणार होत्या. दरम्यान प्रवास सुरु होण्याच्या तीन मिनीटे आधीच संगणकाने मोजणी थांबवली. परिणामी सुनीता विल्यम्स यांचा प्रवास पुढे ढकल्यात आला. त्यानंतर बुधवारी (दि.६ जून) बोईंग कंपनीच्या स्टारलाइनर मोहिमेला प्रक्षेपणात मोठे यश (Sunita Williams) मिळाले.
सुनीता विल्यम्स १ आठवडा अंतराळात थांबणार
अमेरिकेची स्पेस एजन्सी NASA ने सांगितले आहे की, “जर सर्व काही ठीक झाले तर, स्टारलाइनर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर उतरेल. त्यानंतर सुनीता विल्यम्स त्यांचा सहकारी बुच विल्मोर यांच्यासोबत ‘स्टारलाइनर’ अंतराळयान आणि त्याच्या उपप्रणालीची चाचणी घेण्यासाठी सुमारे एक आठवडा अंतराळात थांबतील.”
‘अंतराळात पोहोचन, तेव्हा घरी परतल्यासारखे वाटेल’; सुनीता
नासाच्या या मोहिमेवर प्रतिक्रिया देताना, सुनीता म्हणाल्या, मी थोडी घाबरलेली आहे; पण नवीन अंतराळ यानात उड्डाण करण्यास उत्सुक आहे. जेव्हा मी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचेन, तेव्हा मला पुन्हा घरी परतल्यासारखे वाटेल” अशी भावनिक प्रतिक्रिया देखील सुनीता यांनी दिली. ५९ वर्षीय सुनिता यांनी नासाच्या अभियंत्यांना स्टारलाइनर अंतराळयान डिझाइन करण्यातही मदत केली आहे.
या मोहिमांमध्ये अंतराळवीर सुनीता विल्यम्स सहभागी
2012 मध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या प्रवासादरम्यान अंतराळात ट्रायथलॉन पूर्ण करणाऱ्या विल्यम्स या पहिल्या व्यक्ती ठरल्या होत्या. यूएस नेव्हल अकादमीमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर विल्यम्स यांनी 1987 मध्ये यूएस नेव्हीमध्ये सामील झाल्या. विल्यम्स यांची 1998 मध्ये NASA द्वारे अंतराळवीर म्हणून निवड करण्यात आली होती. 2006 मध्ये मिशन 14/15 आणि 2012 मध्ये 32/33 या दोन अंतराळ मोहिमांमध्ये देखील सुनीता विल्यम्स यांचा महत्त्वाचा सहभाग होता.