गडकरींच्या घराबाहेर काँग्रेसचं आंदोलन

काँग्रेसने रेल्वे तिकीट काढून मजुरांना मुंबईतून बिहार आणि उत्तर प्रदेशात पाठवले. या दोन राज्यात कोरोना पसरवण्यास काँग्रेस (Congress) जबाबदार आहे, असा आरोप पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी संसदेत केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून विरोध केला जात आहे. मोदींच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या घराबाहेर आंदोलन केले
पंतप्रधान मोदींनी संसदेत केलेल्या भाषणाचा निषेध महाराष्ट्र काँग्रेसकडून करण्यात येत आहे. काँग्रेसने बुधवारी राज्यभरात निदर्शने केली. त्यानंतर आज नितीन गडकरींच्या घराबाहेर काँग्रेसने निदर्शने केले आहेत. मोदींनी महाराष्ट्रातील जनतेचा अपमान केला आहे. त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी. आज महाराष्ट्रात ठिकठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरत आहेत. त्याला फक्त मोदींचं वक्तव्य जबाबदार आहे. त्यामुळे त्यांनी आधी महाराष्ट्राची माफी मागावी, असं काँग्रेस आमदार अभिजीत वंजारी म्हणाले.

काँग्रेस कार्यकर्ते नितीन गडकरींच्या घराबाहेर जमल्याचे कळताच चंद्रशेखर बावनकुळेंच्या नेतृत्वात भाजप कार्यकर्त्यांनी देखील आंदोलनस्थळाकडे धाव घेतली. ”ईट का जवाब पथ्थर से” असं म्हणत भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भिडण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी बॅरिकेटींग करून कार्यकर्त्यांना रोखले आहे. आता पोलिस त्यांना ताब्यात घेतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *