विद्यार्थी परीक्षा देऊन येत असताना घडला अपघात, केवळ दैव बलवत्तर म्हणून…

हिंगोली ते सेनगाव रोडवर सवड येथून जवळच असलेल्या रस्त्यावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले त्यामुळे जीप उलटून यामध्ये विद्यार्थी व एक चालक जखमी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी उशिरा घडलीय.

सेनगाव येथील तोषनीवाल महाविद्यालयातून परीक्षा देऊन हे विद्यार्थी MH 20 EZ 1333 या जीपमध्ये सेनगाव येथून हिंगोलीकडे जात होते. दरम्यान सवड गावाजवळील वळण रस्त्यावर जीप चालकाचे नियंत्रण सुटले त्यामुळे जीप रस्त्याच्या कडेला असलेल्या एका विहिरीजवळ जाऊन उलटली. जीप विहिरीपासून थोड्या अंतरावर उलटल्याने मोठी दुर्घटना टळली.
अपघातामध्ये जीप चालक प्रशांतआप्पा सराफ व तीन विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमींना ताबडतोब हिंगोली येथील एका खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आल्याचे सांगितले. जीप उलटली त्या ठिकाणाहून विहिरीचे अंतर हे तीन फूट आहे इतकेच आहे. हा अपघात पाहून रस्त्यावरील ये-जा करणाऱ्या लोकांनी या अपघाताकडे मोठ्या बारकाईने पाहिले. अपघात पाहणारा प्रत्येक जण असं म्हणायचा नशीब बलवत्तर म्हणून वाचले. हिंगोली ते सेनगाव हा राज्यमार्ग असल्यामुळे शेतावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते रोड नवीन बांधण्यात आल्यामुळे सुसाट वेगाने वाहने पळविणाऱ्या चालकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या रस्त्यावर नियमित अपघात होत आहे. त्यामुळे वाहन सावकाश चालविण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *