सांगलीत घरफोडीत सव्वा लाखाचे दागिने लंपास

येथील वारणालीमधील बंद घर फोडून चोरट्याने 1 लाख 25 हजार रुपयाचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले आहेत. याप्रकरणी विशाखा विश्वास वाघ (रा. विद्यानगर) यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले, विशाखा वाघ आणि कुटुंबिय कामेरी (ता. वाळवा) येथे नातेवाईकांकडे लग्न समारंभासाठी गेले होते. त्यामुळे घर बंद होते.
चोरट्याने बंद घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. बेडरूममध्ये असलेल्या लाकडी कपाटाचे लॉक तोडले. दोन तोळ्यांचे सोन्याचे दागिने, 300 ग्रॅमचे चांदीचे दागिने असा सव्वा लाखांचा ऐवज लांबवला. त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी पंचनामा करून अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *