यशवंत जाधव यांच्या घरात झाडाझडती सुरुच

शिवसेना (Shiv Sena) नेते आणि मुंबई महापालिकेतील (BMC) स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या घरावर आयकर विभागाने (Income Tax department) छाप टाकला. आज दुसऱ्या दिवशी आयकर विभागाचे अधिकारी जाधव यांच्या घरी तपास करत आहेत.

शिवसेना कार्यकर्ते जमले
दरम्यान, आज यशवंत जाधव यांच्या घराखाली मोठ्या संख्येने शिवसैनिक जमले होते. यावेळी यशवंत जाधव यांच्या पत्नी आणि शिवसेना आमदार यामिनी जाधव यांनी गॅलरीतयेऊन कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं.

शिवसैनिक आक्रमक झाले होते. यशवंत जाधव यांना आयकर विभागाचे अधिकारी घरातून नेणार असल्याची माहिती पसरली आणि मग रात्रीच शिवसैनिकांनी त्यांच्या घराबाहेर गर्दी करण्यास सुरुवात केली. शिवसैनिकांचा आक्रमक पवित्रा पाहता पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आला.
यशवंत जाधव यांच्यावर भाजपकडून भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी यशवंत जाधव यांच्या घरी छापा मारला. दरम्यान, आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना चौकशीत काही व्यवहारांबाबत ठोस पुरावे, माहिती मिळाली की नाही याबाबत अद्याप कुठलीही माहिती हाती आलेली नाही.

महापौरांनी साधला निशाणा
सरकारला डॅमेज करण्याचा हा प्रयत्न आहे, पण अशा कोणत्याही कारवायांनी ना शिवसेना डॅमेज होईल, ना हे सरकार अशी प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. यंत्रणांना त्यांच्या पद्धतीने काम करू द्या. यशवंत जाधव यांच्या विवरणपत्रात काही त्रृटी असतील तर त्यात सुधारणा करतील. काहींना मात्र या रेडमुळे आनंदाच्या उकळ्या फुटतायत. काय बाहेर येतंय ते पाहूया. आम्ही तपासात अडथळा आणणार नाही, असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *