नारायण राणेंना ते वक्तव्य भोवण्याची शक्यता

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिशा सलियनबाबत वादग्रस्‍त केल्यानंतर मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नारायण राणे सातत्याने दिशा सलियनबाबत बदनामीकारक वक्तव्य करीत असल्‍याचा आरोप त्‍यांच्यावर करण्यात आला आहे.

तसेच, सुशांत सिंह राजपूत केसमधील दिशा सालियन प्रकरणामध्ये मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलेल्‍या तक्रारीवरून रूपाली चाकणकर यांना 48 तासांत अहवाल सादर करण्याचे आदेश मालवणी पोलिसांनी दिले आहेत.

महिला आयोगाला पोलिसांनी रात्री 12 च्या सुमारास अहवाल सादर केला. या अहवालामध्ये दिशा सलियनच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला नव्हता. तसेच ती गरोदरही नव्हती. असे या अहवालामध्ये उघडकीस आले आहे. तसेच यासंदर्भात लाखोंनी टि्‌ट केले होते. त्‍यांचीही चौकशी आता होणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *