राज्यपालांच्या विधानानंतर शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत

(political news) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडतात. यंदा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा नव्या काँट्रोव्हर्सीला जन्म मिळाला आहे. ‘समर्थ नसते तर शिवाजीला कुणी विचारलं असतं का?’ असं वक्तव्य भगतसिंह कोश्यारींनी औरंगाबादमधील एका कार्यक्रमात केलं.

या विधानानंतर त्यांच्यावर काहींनी टीका करायला सुरुवात केली आहे. दरम्यान, शरद पवार यांचा एक जुना व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. त्यामुळे चर्चांना आणखी उधाणं आलंय.

यानंतर राष्ट्रवादीच्या समर्थकांनी शरद पवारांचा एक व्हिडीओ शेअर करत छत्रपतींचे खरे गुरू कोण, हे दाखवून देण्याचा प्रयत्न केलाय. राष्ट्रवादीचे प्रवक्ते संजय तटकरे यांनी हा व्हिडीओ शेअर करत राज्यपालांना आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

जे लोक सांगतात रामदास स्वामी महाराजांचे गुरू होते. ते खोटं आहे. शिवाजी महाराजांचे खरे गुरू जिजाऊ माता होत्या. त्यांचं व्यक्तिमत्व घडवण्याचं काम जिजाऊंनी केलं. शिवाजी महाराजांचा कालखंड नीट अभ्यासला, तर रामदास नव्हते, असं शरद पवारांनी म्हटलंय. ज्यांच्या हातात लेखणी होती, त्यांनी ही कमाल केली. त्यांनी इतिहासात रामदास गुरू असल्याचं लिहून ठेवलं, असं पवार एका जाहीर कार्यक्रमात म्हणाले होते. (political news)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *