शरद पवारांना भाजपचं थेटआव्हान

राज्यात भाजपला (BJP) पुन्हा येऊ देणार नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं. त्यांनाच आता भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. पवारसाहेब तुम्ही काळजी करू नका. आधी स्वतःच्या पक्षाचे ६० आमदार निवडून आणा. इतर प्रादेशिक पक्षांनी १० वर्षांत दोन राज्यांत सत्ता स्थापन केली. तुम्ही अजून साडेतीन जिल्ह्यातच अडकले आहात, असा टोला शरद पवारांना लगावला आहे.
पाच राज्यांच्या निवडणुकीपैकी चार राज्यांत भाजपचा दणदणीत विजय झाला आहे. त्यानंतर राज्यातील भाजप नेते आक्रमक झाले आहे. येत्या सर्व महापालिका आणि २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा एकहाती विजय होणार असल्याचं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केलं होतं. त्यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं होतं. दरम्यान विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित असणाऱ्या महाविकास आघाडीतील तरुण आमदारांनी गुरुवारी शरद पवारांची भेट घेतली. यावेळी पवारांनी ‘घाबरून जाऊ नका, भाजपला पुन्हा राज्यात येऊ देणार नाही’ असं वक्तव्य करत आमदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भाजपने पवारांवर निशाणा साधला आहे.

पवारसाहेब भाजपची काळजी करू नका. स्वतःच्या पक्षाचे 60 च्या वर आमदार निवडून आणा. इतर प्रादेशिक पक्षांनी 10 वर्षात दोन राज्यात सत्ता स्थापन केली आहे. तुम्ही अजून साडे तीन जिल्ह्यातच अडकलात. 55 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री बनवून दाखवा, असं आव्हान पवारांना दिलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *