पोलीस भरतीत ‘डमी’ पाठवले, बोगस भरतीचा पर्दाफाश

पोलीस भरतीतील बोगस उमेदवार पाठवल्याचं आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. मुंबई पोलीस भरतीत डमी उमेदवार पाठवल्याचं यामुळे उघड झालंय. भोईवाडा पोलीस ठाण्यात औरंगाबाद व पुणे येथील दोन तरुणांवर या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सोपान शेलार आणि ज्ञानेश्वर गोवळकोंडा अशी या आरोपी़ची नावे आहेत.
सोपन याने लेखी परिक्षेसाठी कागदपत्रांची पूर्तता केली. मात्र दुसऱ्या दिवशी ओळखपत्रावर ज्ञानेश्वर याचा फोटो लावून लेखी परीक्षेसाठी ज्ञानेश्लावरला पाठवले. सोपान याला कांदिवली स्टेशनजवळ बजाज बीएमसी स्कूल हे सेंटर आले होते.

मात्र कागदपत्रांच्या पडताळणीत ही बाब समोर आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपासाला सुरुवात केली. या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी सोपान शेलार याला अटक केली आहे. तर ज्ञानेश्वर गोवळकोंडा याचा शोध पोलीस घेत आहेत. या पूर्वीही अशा प्रकारचे ८ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी संबंधित प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *