सतेज पाटील यांनी शिवसेना चालविण्याचा ठेका घेतलाय?

(political news) पालकमंत्री सतेज पाटील यांनी शिवसेनेचा ठेका घेतला आहे का, असा पलटवार आ. चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केला आहे. चंद्रकांत पाटील यांनीच शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, अशी टीका पालकमंत्री सतेज पाटील यांनी केल्यानंतर पालकमंत्र्यांच्या टिकेला त्यांनी उत्तर दिले .

आ. पाटील म्हणाले, आता युद्धद पेटले आहे. आमच्यावर केसेस घालणे, शिव्या घालणे असे प्रकार सुरू होणार आहेत. पुरव्याशिवाय आरोप करू नका, असे आदेश आम्ही कार्यकर्त्यांना दिले आहेत. कोल्हापूर उत्तर मतदारसंघामध्ये भाजपचीही मते आहेत. भाजपच्या मतावर शिवसेना विजयी होत होती. कोणी पाठीत खंजीर खुपसला, हे मतदार राजा ठरवेल.

आ. पाटील म्हणाले, शिवसेनेबाबत राजेश क्षीरसागर हे बोलले असते, तर ठिक आहे; मात्र पालकमंत्री सतेज पाटील शिवसेनेविषयी बोलत आहेत. ते शिवसेना चालविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, येथील शिवसेनेचे नेतृत्व प्रगल्भ व समर्थ आहे. शिवसेनेचा मतदार ‘हाता’वर शिक्का मारतो का पाहूया! (political news)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *