पोस्टात परीक्षा न देता नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय टपाल विभाग (Indian Postal Department), महाराष्ट्रनं भरतीसाठी अधिसूचना जारी केलीय. या भरतीअंतर्गत मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, टायर मॅनसह इतर पदांवर भरती केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 9 पदांची भरती करण्यात येणार असून भरतीसाठी इच्छुक उमेदवार 9 मे 2022 पर्यंत अर्ज करू शकतील.रिक्त पदांची संख्या

मेकॅनिक : 5 पदं
इलेक्ट्रिशियन : 2 पदं
टायर मॅन : 1 पोस्ट
लोहार : 1 पद

शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी उमेदवारांनी सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही तांत्रिक संस्थेतील संबंधित विभागामधील प्रमाणपत्रासह आठवी उत्तीर्ण किंवा संबंधित विभागामध्ये एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. मेकॅनिक पदासाठी उमेदवाराकडं अवजड वाहनांसाठीचा वैध ड्रायव्हिंग परवाना असणं गरजेचा आहे.

वयोमर्यादा : या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांचं वय 18 ते 30 वर्षे या दरम्यान असावं.
पगार : या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 19,900 रुपये वेतन दिलं जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *