मिरज : अडीच वर्षांचा अगत्य देशात पहिला

येथील अगत्य निशांत खाडे याने बौद्धिक स्पर्धेत (competition) देशात पहिला क्रमांक पटकावून सुवर्णपदक मिळविले. त्याचा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

या स्पर्धेसाठी (competition) देशभरातून मुलांचा सहभाग होता. अडीच वर्षांपर्यंत मुलांसाठी असलेल्या या स्पर्धेत अगत्य याने 29 सेकंदात कागदाचे रंग व प्राण्याचा आवाज ओळखणे, 19 प्राण्यांना केवळ 56 सेकंदात ओळखणे, प्राण्याची सावली अवघ्या 90 सेकंदात ओळखणे, 1.43 सेकंदात जंगली प्राण्याच्या सावलीचे वर्गीकरण करणे, 1.33 सेकंदात एकूण 15 जंगली प्राण्यांची वास्तविक आकृती ओळखणे, 44 सेकंदामध्ये आकार ओळख व 27 सेकंदांमध्ये संख्या ओळख, अक्षरांची शब्दांमध्ये ओळख, कार्गो नेटच्या दोरीने चढणे, असे वेगवेगळे बौद्धिक खेळ करून दाखविले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *