महाविकास आघाडी सरकार उलथवण्याचा कट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थाना समोरवर हनुमान चालिसा म्हणण्याआड मोठा कट होता. सरकार उलथवण्यासाठी स्थिती निर्माण करण्याचा हेतू, होता अशी बाजू मुंबई पोलिसांनी सत्र न्यायालयात मांडली आहे.

मातोश्रीवर हनुमान चालिसा पढण्याआड कायदा सुव्यवस्था निर्माण करण्याचा कट राणा दाम्पत्याने आखला होता, असे पोलिसांनी न्यायालयात म्हटले. एवढंच नाही तर याद्वारे महाविकास आघाडी सरकारच बरखास्त करण्याचा हेतू यात होता, असं पोलिसांनी न्यायालयात सांगितले. राणांच्या जामिनाला विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी काल लेखी उत्तर कोर्टात सादर केले आहे. त्यात हे सर्व नमूद करण्यात आले आहे. ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थानी हे शिवसैनिकांसाठी धर्मस्थळ आहे, असेही पोलिसांनी म्हटले आहे.

दरम्यान, हिंदुत्वाच्या नावावर देशाच्या विभाजनाचा कट आखला जातोय, असा आरोप संजय राऊत यांनी म्हटले आहे. शिवसेना हा कट हाणून पाडेल, असेही संजय राऊत यांनी म्हटले. शिवसेनेला भाडोत्री हिंदुत्वाची गरज नाही, हिंदुत्व शिवसेनेच्या रक्तात आहे ,असं राऊत यांनी ठणकावले. योगींना टकला, गंजा म्हणणारे आज अयोध्येत त्यांच्याकडून संरक्षण घेणार आहेत, अशी टिका त्यांनी मनसेवर केली. तर दुसरीकडे राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. दरम्यान राणा दाम्पत्याला सत्र न्यायालयाने झटका दिला आहे. राणा दाम्पत्यानं घरचं जेवण मिळण्यासाठी केलेला अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याला आता जेलमधील जेवणच जेवावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *