फुलांच्या माळांची विक्री ते आमदार… रमेश लटके यांचा राजकीय प्रवास

शिवसेनेचे आमदार रमेश लटके ( ramesh latke ) यांचे बुधवारी रात्री हृदयविकाराच्या धक्याने दुबई येथे निधन झाले. मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघामधून आमदार म्हणून ते निवडून आले होते. त्‍यांच्‍या आकस्‍मिक निधनाने शिवसेनेच्‍या कार्यकर्त्यांसह मतदारसंघातील नागरिकांना धक्‍का बसला आहे.
आमदार रमेश लटके हे शाहूवाडी तालुक्यातील येळवण जुगाईजवळच्या शेम्बवणे पैकी धुमाकवाडी या छोट्या गावातील मूळ रहिवासी होते. मुंबईचे चाकरमानी असणारे वडिलांसोबत त्यांनी मुंबईत दुधाचा व्यवसाय, फुलांच्या माळा (हार) विकण्याचा व्यवसायाने आपली कारर्कीद सुरु केली. यातून त्यांनी लोकसंपर्काच्या जोरावर शिवसेना शाखा प्रमुख, मुंबई महानगरपालिकेचे सलग तीनदा नगरसेवक, स्थायी समिती सभापती, बेस्ट अध्यक्ष आणि पुढे सलग दोनवेळा आमदार असा सर्वसामान्‍यांना थक्‍क करणारा राजकीय प्रवास केला. बांधकाम आणि हॉटेल व्यवसायात त्यांनी आपला जम बसविला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *