महाराष्ट्राच्या राजकारणातला वाघ नेमका कोण?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील बीकेसी मैदानावर घेतलेल्या शिवसेनेच्या जाहीर सभेत भाजपवर सडकून टीका केली आहे. दरम्यान, यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद फडणवीस यांनी उत्तर सभा घेत मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा साधला आहे. फोटोग्राफी वरुन वाघ होता येत नाही. कुठल्या संघर्षात तुम्ही होता. पूर्ण सभा ऐकल्यावर वाटलं लाफ्टर सभा, असा टोला फडणवीसांनी लगावला होता. दरम्यान, आता शिवसेनेकडून यावर प्रतिक्रिया येत आहेत.मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी फडणवीस यांच्या या वक्तव्याच खरपूस समाचार घेतला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातला वाघ नेमका कोण आहे हे तुम्ही वेळीच ओळखा, असं म्हणत त्यांनी फडणवीस यांच्या भूमिकेवर टीका केली आहे. यावेळी अनेक विषयांवर त्यांनी भाष्य केलं आहे.पेडणेकर म्हणाल्या भगवा हा भाजपचा कधीच नव्हता. तुम्ही वानरसेना म्हणत आहात, तर मग पुष्टी मिळाली की राम आमच्या मनात आहे. तुम्ही न्यायालय आहात का? यशवंत जाधव आले तर मग त्यांना मुख्यमंत्र्यांनी समर्थन दिले असे होत नाही. तुम्ही स्वःताच कबुल केले की, मुख्यमंत्री हलके फुलके आहेत. ते आहेतच हलके फुलके. पण तुमचे जसे राजकीय वजन तसे त्यांचेही राजकीय वजन आहे. तुम्ही मेट्रो मॅन असाल तर पापाचे पण धनी व्हा. जी झाडं तोडली जे पशु-पक्षी मारले त्याचेही धनी व्हा, असंही त्यांनी फडणवीसांना खडसूण सांगितलं आहे.केतकी चितळेचा अभिमान असून ती कणखर असल्याचं वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केलं आहे. यावर त्या म्हणाल्या, केतकी चितळे ही अभिनेत्री आहे. तिच्या आजाराची सगळ्यांना माहिती आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अनुभवाला राजकारणात अधिक महत्व आहे. सदाभाऊ खोत यांनी चितळेच्या वक्तव्याचे समर्थन केलं. त्यांना ही गोष्ट आम्ही सांगावी लागते हेच दुर्दैव आहे. यातून सदाभाऊ खोत यांची राजकीय अपरिपक्वता दिसून येते.अमृता फडणवीस यांच्या ट्विटसंदर्भात विचारले असता पेडणेकर म्हणाल्या, त्या ट्विटबद्दल मला काहीच समजलं नाही. त्याचा कोणताही संदर्भ लागत नाही. अमृता फडणवीस यांना चर्चेत राहण्याची सवय लागली आहे. ते ट्विट देवेंद्रजींनी वाचले तर त्यांनाही प्रश्न पडेल की माझ्या बायकोचे काय चालले आहे. एखाद्याचे कमी म्हणून राजकीय वजन कमी होत नाही. आम्ही त्यांच्या ट्वीटकडे फारसे लक्ष देत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *