महाराजांसमोर नतमस्तक होणाऱ्या फोटोसह संभाजीराजेंचं भावनिक ट्विट

राज्यसभेच्या (Rajya Sabha Election) रिक्त होणाऱ्या जागांपैकी सहाव्या जागेवर संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आणि सर्वपक्षीय आमदारांनी आपल्याला पाठिंबा द्यावा असं पत्रही त्यांनी लिहिलं. त्यानंतर शिवसेनेकडूनही संभाजीराजेंना ऑफर देण्यात आली. मात्र, संभाजीराजेंकडून शिवसेनेच्या ऑफरवर प्रतिक्रिया न आल्याने अखेर शिवसेनेने संजय पवार यांना सहाव्या जागेवरुन उमेदवारी देण्याचं ठरवलं. त्यामुळे संभाजीराजेंचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. त्याच दरम्यान आज संभाजीराजे छत्रपती यांनी एक सूचक ट्विट केलं आहे.

संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोर नतमस्तक होणारा फोटो संभाजीराजेंनी शेअर केला आहे. हा फोटो पोस्ट करताना संभाजीराजेंनी लिहिलं, “महाराज… तुमच्या नजरेतलं #स्वराज्य मला घडवायचंय… मी कटीबद्ध असेन तो तुमच्या विचारांशी… मी बांधील असेन तो फक्त जनतेशी..”संभाजीराजे यांनी केलेल्या या ट्विटमुळे आता संभाजीराजे काय निर्णय घेतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. शिवसेनेने संजय पवार यांना सहाव्या जागेसाठी उमेदवारी दिल्यानंतर आता संभाजीराजे अपक्ष निवडणूक लढणार की नाही? याबाबत अद्याप स्पष्टता नाहीये. तर जोपर्यंत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सहाव्या जागेसाठी अधिकृत उमेदवाराची घोषणआ करत नाहीत तोपर्यंत संभाजीराजे प्रतिक्रिया देणार नाहीयेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *